इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचा भारत दौरा स्वच्छ भारत अभियानापेक्षा महत्वाचा आहे का असा सवाल नेटकरी विचारत आहेत. हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण आहे तो इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक फोटो.
नेतान्याहू यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. मात्र त्यासाठी या परिसरामध्ये बसविण्यात आलेले सर्व कचऱ्याचे डब्बे उलटे करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने ही काळजी घेण्यात आली होती तरी या उलट्या डब्ब्यावरून ट्विटवर चांगलीच चर्चा रंगली.
सिद्धार्थ यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये दिल्ली पोलिसांनी राजघाट परिसरातील सर्व कचऱ्याचे डब्बे उलटे करुन ठेवल्याचे म्हटले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानापेक्षा सुरक्षा महत्वाची असंही सिद्धार्थने ट्विटमध्ये म्हटले आहे.
With @netanyahu visiting #RajGhat @DelhiPolice has turned all dustbins in the area upside down. Security cloud over #SwachhBharat @timesofindia @rajshekharTOI pic.twitter.com/1Za2vlPl1i
— SidharthaTOI (@SidharthaTOI) January 15, 2018