पहिल्यांदा बर्फवृष्टी अनुभवताना आपल्याला किती आनंद होतो. या बर्फापासून स्नोमॅन बनवणे, बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकणे, मजा मस्ती करणे अशी कितीतरी धम्माल आपण करतो. पण प्राण्यांना अशी धम्माल करताना पाहिलीत का कधी? ‘सिनसिनाटी’ प्राणी संग्रहालयाने काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या वहिल्या बर्फवृष्टीचा आनंद घेणा-या या मुक्या जिवांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरू झाली की आपले रक्षण करण्यासाठी एकतर प्राणी उबदार प्रदेशात स्थलांतर करतात किंवा शीतनिद्रेत जातात. तर काही अन्नांची साठवण करून आपल्या बिळात किंवा तत्सम निवा-यात राहणे पसंत करतात. पण या बर्फात मजा मस्ती करताना तुम्ही त्यांना क्वचितच पाहिले असेल. आयुष्यात पहिल्यांदाच अशा बर्फवृष्टीचा आनंद घेणा-या प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ सिनसिनाटी प्राणी संग्रहालयाने शेअर केले आहेत. फक्त दहा महिन्यांची असलेली चित्त्यांची पिल्ले पहिल्यांदाच बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. आतापर्यंत असे कधीच अनुभवले नसल्याने ही पिल्ले एकमेकांचा पाठलाग करून मजा मस्ती करताना दिसत आहेत. तर दुस-या एका व्हिडिओमध्ये पांडाची पिल्लेही या बर्फाचा आनंद घेताना दिसत आहेत. एरव्ही बर्फाळ प्रदेशात वावरणारे पेंग्विनही एकसाथ संग्रहालयाच्या भटकंतीला निघाले होते. त्यामुळे या प्राण्यांना पहिल्यांदा बर्फात मजा मस्ती करताना पाहण्यासाठी अनेक लोक संग्रहालयात जमले होते.

Story img Loader