बकरी ईदपूर्वी उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचं नशीब पालटून गेलं आहे. कारण हा शेतकरी रातोरात तब्बल ५१ लाखांचा मालक बनला आहे. शिवाय तो लखपती बनायला दोन बकरे कारणीभूत ठरले आहेत. हो कारण लखनऊच्या बकरा मंडीत अरबी भाषेत ‘अल्लाह’ असे चिन्ह असलेल्या दोन बकऱ्यांची जवळपास लाख रुपयांना विक्री झाली आहे. १८ महिन्यांच्या सलमान नावाच्या बकऱ्याचे वजन ६५ किलो असून त्याच्या उजव्या कानावर जन्मचिन्ह आहे. राजस्थानी बकरी गनीमध्येही अशीच वैशिष्ट्ये आहेत. दोन्ही बकरे मुश्ताक अहमद या ४५ वर्षीय स्थानिक शेतकऱ्याचे आहेत. तर हे बकरे या वर्षी विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या बकऱ्यांपैकी असल्याचं सांगितलं जात आहे. अरबीमध्ये सलमान शब्दाचा अर्थ नम्र आणि निष्ठावान, तर गनी म्हणजे श्रीमंत आणि उदार असा मानला जातो.

या बकऱ्यांचा मालक अहमद म्हणाला, “मी बकऱ्यांसाठी सोन्याचे काठ असलेले हिरवे कपडे तयार केले आहेत. मी राजस्थानमधून एक वर्षापूर्वी गनी खरेदी केली होती, तेव्हा माझ्या घरी सलमानचा जन्म झाला. त्यांच्या अंगावर असणाऱ्या पवित्र चिन्हांमुळे ते महागात विकले गेले. मी त्यांच्या आहारावरही भरपूर पैसे खर्च केले आहेत.” बकरा मंडीत बारबारी, तोतापरी, पंजाबी बीटल, कोटा आणि आफ्रिकन बोअर आणि सॅनेन (स्वित्झर्लंड) सारख्या विदेशी जातीच्या सुमारे एक लाख शेळ्या विक्रीसाठी आणल्या असल्याचं सांगितलं जात आहे

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

हेही पाहा- पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या वासराला जेसीबी चालकामुळे मिळालं जीवदान, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

बाजारात बकऱ्यांसह अन्य प्राणीही विक्रीसाठी –

बाजारात विक्रीसाठी आणलेल्या प्राण्यांना अनेक मालकांनी पठाण, हीरा, राजकुमार आणि वाघ अशी नावे दिली आहेत, ज्यांची किंमत सुमारे १० हजार रुपयांपासून सुरू होते. या बाजारात म्हशीदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जवळपास १० वर्षांपासून मार्केटचे व्यवस्थापन सांभाळत असलेल्या अबरार खान यांनी सांगितलं की, “या वर्षी, मागील तीन वर्षांच्या तुलनेत आम्हाला चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे.”

Story img Loader