सध्या अनेक परदेशी व्यक्ती आपली संस्कृती म्हणा किंवा खाद्यसंस्कृती आत्मसात करीत असल्याचे आपल्याला विविध सामाजिक माध्यमांवरून पाहायला मिळते. काही परदेशी तर थेट भारतात काही काळ राहून इथल्या रूढी-परंपरा समजून, शिकून घेतात. अशाच एका तरुणीचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये परदेशी तरुणी चक्क हातगाडीवर कांदे-बटाटे विकत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @mariechug नावाच्या अकाउंटने स्वतःचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या तरुणीचे नाव मेरी असे आहे. मेरी सुरुवातीला एका हातगाडीवर कांदे-बटाटे विकणाऱ्या भाजीविक्रेत्याला “नमस्ते भाऊ, मला भाजी विकायला शिकवाल का?” असे हिंदीमध्ये विचारते. त्याचे हो हे उत्तर ऐकून, ती त्या भाजीविक्रेत्याच्या बाजूला जाऊन उभी राहते. तसेच त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारते. त्यावर भाजीवाला त्याचे नाव “प्रतीक” असल्याचे सांगतो.

हेही वाचा : Video : वाह! फॉरेनर दाखवतोय महाराष्ट्रीयन ‘कांदे-पोहे’ रेसिपी! “आम्हाला मुलगा पसंत आहे!” म्हणाले नेटकरी

पुढे मेरी समोर ठेवलेला बटाटा आणि कांदा उलचून लोकांना ते विकत घेण्यासाठी सांगते. दरम्यान, एक ग्राहक तिथे येतो. त्याला “नमस्ते” म्हणून मेरीने ग्राहकाचे स्वागत केले आणि नंतर भाजीवाल्याच्या मदतीने ग्राहकाला १५ रुपयांचे बटाटे विकले. पुढे भाजीवाल्याने मेरीला नाना पाटेकरचा एक प्रसिद्ध डायलॉगदेखील शिकवला.

मेरी तिच्या नाजूक आवाजात आणि थोडी अडखळत, “सुभे से ना बिका है आलू, ना बिका है आधा प्याज” हा डायलॉग म्हणून दाखवते. व्हिडीओच्या शेवटी मेरी अजून एका ग्राहकाला बटाटा विकते. प्रत्येक वेळी आलेल्या ग्राहकाचे या तरुणीने नमस्ते म्हणून स्वागत केले, तसेच त्यांची नावे विचारल्याचे व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो.

मेरीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहा :

“खूपच संस्कारी मुलगी आहे,” असे एकाने म्हटले आहे. “वाह! या व्हिडीओने तर सगळ्यांचेच मन जिंकले आहे…” असे दुसऱ्याने म्हटले. “तुमचे व्हिडीओ पाहिले की, माझा दिवस नेहमी चांगला जातो,” असे तिसऱ्याने लिहिले आहे.

हेही वाचा : लंडनच्या रस्त्यांवर घागरा परिधान करून फिरणाऱ्या तरुणीने फॉरेनर्सना लावले वेड; Video पाहा

मेरीने तिच्या mariechug नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १५.३ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.