सध्या सोशल मीडियावर दोनच गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीची आणि दुसरी म्हणजे चिमुकल्या साईराजच्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याची. साईराज केंद्रे नावाच्या चिमुकल्याने केलेला गोंडस व्हिडीओ पाहून सर्वांनाचा त्याचे कौतुक वाटतं आहे. साईराज मोहक हावभाव आणि गोंडस अभिनयामुळे रातोरात प्रसिद्ध झाला त्याचा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
साईराजच्या गाण्यावर आधारीत अनेक मिम आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता साईराजच्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ याच गाण्याचं एका चिमुकलीने विदेशी व्हर्जन करुन दाखवलं आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल यात शंका नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील चिमुकली विनोदी मराठी अभिनेता अंशुमन विचारे याची मुलगी आहे. हा व्हिडीओ अंशुमन विचारे याच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये ही चिमुकली आधी खूप सुंदर पद्धतीने साईराजची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे. त्यानंतर तिला हेच गाणं विदेशी मुलगी कशी म्हणेल असं विचारताच ती विदेशी लोकांच्या आवाजात आणि स्टाईलमध्ये हे गाण गायला सुरुवात करते. जे खूप सुंदर आणि मनमोहक आहे. तर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कुणीही शिकवलेल नाही… आजकालची सगळी पिढी एक पाऊल पुढे, ही सगळी बच्चेकंपनी खूप पुढे जाणार… गणपती बाप्पा मोरया!!!”
या मुलीचा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकजण व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर खूप छान व्हिडीओ आणि अभिनय असल्याचं कमेंटमध्ये लिहिलं आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
व्हायरल व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका युजरने लिहिलं आहे, आम्हाला foreign ची मुलगी आवडली. तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “गोड, काही तरी नवीन बघून छान वाटलं.” तर आणखी एकाने लिहिलं “किती गोड… ह्याला म्हणतात टॅलेंट… नाहीतर आपलं तेच तेच…” तर अनेकांनी व्हिडीओवर लव्ह इमोजी केली आहे. त्यामुळे लोकांना या चिमुकलीच्या गाण्याचं विदेशी व्हर्जन खूप आवडल्याचं दिसत आहे.