Viral Video: जगभरातील लोकांना भारतातील विविध गोष्टींचे नेहमीच आकर्षण असते. अनेक परदेशातील लोक भारतीय वेशभूषा, भारतीय पदार्थ, येथील सण-समारंभदेखील आवडीने साजरे करताना दिसतात. मागील काही वर्षांपासून भारतीय तरुण-तरुणींसोबत अनेक परदेशातील तरुण-तरुणी लग्न करताना दिसत आहेत. हे लग्न अनेकदा ते भारतीय पद्धतीने करतात, ज्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सध्या अशाच एका कपलचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील पुरुष भारतीय असून त्याची पत्नी परदेशातील आहे. यावेळी या महिलेने महाराष्ट्रीयन लूक केल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्राची पुरणपोळी, वडापाव जसा जगभरात फेमस आहे तसेच महाराष्ट्रातील विविध प्रथा, परंपरादेखील जगभरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रीयन नऊवारी साडीतील लूकदेखील अनेक स्त्रिया सण-समारंभासाठी आवर्जून करतात. अनेक अमराठी कलाकारदेखील हे लूक आवडीने करताना दिसतात. दरम्यान, आता या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये परदेशी महिलेलादेखील नऊवारी साडीची भुरळ पडलेली दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओतील परदेशी महिला एका दुसऱ्या महिलेकडून गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून घेते. त्यानंतर हातात हिरवा चुडा, गळ्यात ठुशी आणि मंगळसूत्र घालते, तसेच शेवटी ती नथही घालते. या लूकमध्ये ही महिला खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर तिचा पतीदेखील कुर्ता घालतो. त्यानंतर हे दोघेही व्हिडीओमध्ये पोझ देतात. हा व्हिडीओ शेअर करत त्या महिलेने कॅप्शनमध्ये, “महाराष्ट्रावर खूप प्रेम”, असं लिहिलं आहे.

हेही वाचा: “फु बाई फु फुगडी फू….”; तरुणांनी मांजरीसोबत केला डान्स; VIDEO पाहून माराल कपाळावर हात

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @namastejuli या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज, तर एक लाखांहून अधिक लाइक्स आल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “अति सुंदर, खूप सुंदर दिसत आहेस”, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “मराठी मुलगी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “ही जोडी खूप क्यूट आहे.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.”

Story img Loader