Foreigner speaking in Marathi language: आपली मायबोली मराठी भाषा ही आपल्याला जितकी प्रिय आहे तितकीच ती परदेशातील काहीजणांनादेखील प्रिय आहे. सध्या एका भाषेपेक्षा अनेक भाषा शिकायला अनेकांना आवडतं. सोशल मीडियाद्वारे आपण जसं जगभरात घडणाऱ्या गोष्टी घरबसल्या पाहू शकतो, तसं परदेशातील व्यक्तींना आपल्या मराठी मातृभाषेत बोलताना आपण क्वचितच ऐकलं असेल.
परदेशात काहींना भारतात सामान्यत: बोलली जाणारी हिंदी भाषा ठाऊक असते, पण मराठी भाषा बोलणारे परदेशी अगदी क्वचित तुम्हाला दिसतील. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यातील परदेशी महिलेचं मराठी ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
‘itsnotkadi‘ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. व्हिडीओची सुरुवात होताच एक परदेशी स्त्री चक्क मराठीत बोलायला सुरुवात करते. “तुला माहीत आहे की माझी मराठी चांगली नाहीय, पण तुम्हाला पाहिजेय की मी मराठीत बोलावं.” असं ती महिला बोलते. मग विचार करत ती पुढे सिंघम चित्रपटातील मराठी डायलॉग म्हणते, “आता माझी सटकली”; तर त्यानंतर ती मराठीत आकडे बोलून दाखवते, जसे की पन्नास, शंभर.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा मराठी प्रश्न म्हणजे, जेवलीस का? हादेखील तिने या व्हिडीओद्वारे विचारलाचं, तसंच झोप झाली का? हेदेखील तिने विचारलं; तर व्हिडीओच्या शेवटी ती “जय महाराष्ट्र” म्हणाली.
हेही वाचा… स्टंट करणं पडलं महागात! २४ जणांना अटक केली अन्…, VIDEOतून पाहा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
‘Kadi Tucker’ असे या महिलेचे नाव असून ती बहूभाषाकोविद (polyglot) आहे, म्हणजेच तिचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यासाठी तिच्या एका फॅनने आग्रह केला होता की, दीदी मराठी रील कर ना; यावर Kadi Tuckerने हा व्हिडीओ शेअर केला.
युजर्सच्या प्रतिक्रिया
itsnotkadi यांचं मराठी ऐकून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. एका युजरने कमेंट करून लिहिलं, “ताई तुम्ही खूप छान मराठी बोलता, मला तर खूप आवडतं”; तर एक जण म्हणाला, “तुम्हाला मराठी बिग बॉसमध्ये जायला हवं होतं.” तर अनेकांनी त्यांच्या भाषेत बोलण्याचा त्यांना आग्रह केला.
हेही वाचा… शिक्षकाचे भर वर्गात विद्यार्थिनीबरोबर संतापजनक कृत्य; कानाखाली मारलं अन्… धक्कादायक VIDEO VIRAL