Viral Video: भारतीयांच्या मनात नेहमीच अभिमानाची भावना येते जेव्हा ते परदेशातील किंवा इतर देशातील लोकांना भारतीय भाषेत बोलताना, येथील खाद्यपदार्थ आवडीने खाताना आणि पोशाख घालताना पाहतात. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल, तर दक्षिण आफ्रिकेच्या एका तरुणाचा कुर्ता घालून भारतीय स्ट्रीट फूड चाखतानाचा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच आवडेल. कारण या तरुणाने फक्त भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा स्वाद घेतला नाही. तर रस्त्याकडेला राहणाऱ्या काही चिमुकल्यांना सुद्धा खाऊ घातला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा हा नागरिक सात महिन्यांपासून भारतात आहे. आज त्याने भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड चाखण्याचा निर्णय घेतला आहे. व्हायरल व्हिडीओ मुंबईचा आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा नागरिक लालभडक निखाऱ्यावर भाजलं जाणारं मक्याचे कणीस खाण्यासाठी आला आहे. तरुण स्वतःसाठी आणि मित्रासाठी दोन मक्याचे कणीस विकत घेतो. त्यानंतर रस्त्याकडेला पोटा-पाण्यासाठी पैसे मागणाऱ्या दोन गरजू मुली तेथे आल्या. त्यांनाही या तरुणाने विचारले तुम्हीसुद्धा मक्याचे कणीस खाणार का ? तेव्हा त्या हो म्हणाल्या. तेव्हा तरुणाने गरमागरम मक्याचे कणीस मुलींना खायला दिले. तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…कात्री नव्हे तर ‘या’ वस्तूने कापले ‘त्याने’ तरुणीचे केस; VIDEO पाहून व्हाल थक्क अन् म्हणाल हा कोणता हेअरकट?

व्हिडीओ नक्की बघा…

टायने डिव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी आहे. त्याच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तो सध्या भारतात राहतो. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, टायने कुर्ता-पायजामा घातलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा एक मित्रही आहे. दोघेही हातगाडीजवळ उभे आहेत आणि भाजलेले मक्याचे कणीस विकत घेताना दिसत आहेत. तसेच तो त्या विक्रेत्यांनाबरोबर हिंदी, इंग्रजी भाषेत प्रेमळ संवाद साधताना आणि आणि पैशांची मदत करताना सुद्धा दिसून आले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ टायने डिव्हिलियर्स याच्या @tayne_devilliers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “भारताने मला खूप काही शिकवले आहे आणि या देशाला महान बनवणाऱ्या लोकांकडे वेळ आणि लक्ष देणे गरजेचं आहे. मला येथील लोकांच्या गोष्टी जाणून घ्याल खूप आवडते. कारण येथील काही जण खूप आर्थिक परिश्रम करत आहेत; आपल्या प्रियजनांच्या दोन वेळेच्या जेवणासाठी दररोज अथक परिश्रम करत आहेत ; असं कौतुक त्याने कॅप्शनमधून केलं आहे ; जे सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतं आहे.