Mumbai Local Train Viral Video : स्वप्नांची नगरी म्हटली जाणारी मुंबई प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. उद्योगपतींपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत, मजुरांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाला मुंबई हवी-हवी वाटते. मात्र, मुंबईत जगण्यासाठी प्रत्येक जण रोज कामासाठी धावपळ करताना दिसतो. या धावपळीत सर्वसामान्यांचा आधार असते ती म्हणजे मुंबई लोकल. रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. यात मुंबई पाहण्यासाठी म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या परदेशी लोकांनाही मुंबई लोकलने प्रवास करण्याचा मोह आवरत नाही. अशाचप्रकारे एक ॲडम नावाचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसर मुंबई फिरण्यासाठी म्हणून आला, यावेळी त्याने चर्चगेट स्थानकावरील त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो त्याचा मोबाइल चोरी झाल्याचे सांगतोय. पण, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी उलट त्यालाच चांगले फटकारले आहे. एका युजरने तर त्याला त्याच्या देशात परत जा, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा