‘बेबी शार्क’ हे लहान मुलांचं गाणं आहे आणि ९ अब्जाहून जास्त व्ह्यूजसह आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिलेला YouTube व्हिडीओ आहे. पिंकफॉन्ग नावाच्या चॅनेलने शार्कच्या कुटूंबावर तयार केलेलं हे गाणं लहान मुलांसोबतच प्रौढांमध्ये सुद्धा लोकप्रिय ठरलंय. या गाण्यात दोन लहान मुलं मुली शार्कच्या संपूर्ण कुटुंबातील एक-एक सदस्याची ओळख करून देताना दिसून येत आहेत. ही दोन्ही चिमुकले आपल्या इवल्या इवल्याश्या हाताने शार्कच्या जबड्याचे अनुकरण करतात. पिंकफ्रॉगचं हे गाणं २६ नोव्हेंबर २०१५ रोजी YouTube वर अपलोड करण्यात आलं होतं. तेव्हापासून या ‘बेबी शार्क’ गाण्याची क्रेझ काही संपलेली नाही.

इतकंच काय तर या गाण्यामुळे ‘बेबी शार्क चॅलेंज’ ही सुरू झालं होतं. या चॅलेंजमध्ये युजर्सनी ‘बेबी शार्क’ गाण्यावर डान्स व्हिडीओ बनवून शेअर करण्यास सुरुवात केली. फक्त मुलंच नाही तर त्यांचे पालक सुद्धा या गाण्यावर विशेष वेषभूषा करत थिरकू लागले.

परंतु अलीकडेच ओक्लाहोमामधील माजी कैद्यांच्या एका गटाने ओक्लाहोमा काउंटी अधिकार्‍यांना छळण्यासाठी हे गाणं वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. यासाठी त्यांच्यावर खटला सुद्धा दाखल झालाय. त्यानंतर हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, तीन माजी कैद्यांनी सांगितलं की, तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्यांचा ‘छळ’ केला. यात त्यांना तासनतास ‘बेबी शार्क’ हे गाणं ऐकायला लावलं. ही गाणं ऐकवताना त्यांना हातकडी लावून उभं राहण्यास भाग पाडलं गेल्याचं आढळून आलं. त्यानंतर आता ओक्लाहोमा काउंटी तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे हे काय! हायवेवरील वाहतूकीवर नजर ठेवणाऱ्या सीसीटीव्हीवर जेव्हा पोपट डोळे मोठे करून पाहतो…

डॅनियल हेड्रिक, जोसेफ जॉय मिशेल आणि जॉन बास्को यांनी मंगळवारी ओक्लाहोमा सिटी फेडरल कोर्टात ओक्लाहोमा काउंटी कमिशनर, शेरीफ टॉमी जॉन्सन, जेल ट्रस्ट आणि दोन माजी जेलर यांच्या विरोधात दिवाणी खटला दाखल केला. ‘बेबी शार्क’ गाणे वाजवून त्यांचे हात मागे बांधून किमान चार कैद्यांना भिंतीला बांधलं गेलं होतं. गेल्या वर्षी फौजदारी तपासणीनंतर आता याबाबतचा खटला दाखल झाला आहे. या खटल्याशी संबंधित चौथा माजी कैदी ब्रँडन नेवेल याने मात्र तुरुंगात खटला दाखल केला नाही. कारण त्याला या घटनेच्या एका महिन्यानंतर फर्स्ट डिग्री मर्डरसाठी दोषी ठरविण्यात आलं होतं.

आणखी वाचा : PHOTOS : ‘हे’ देशी जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल! यांच्याकडे प्रत्येक प्रोब्लेमवर आहे सोल्यूशन

नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१९ मध्ये या गाण्याबाबत किमान दोन वेगळ्या घटना नोंदवण्यात आल्या. 2019 मध्ये वेस्ट पाम बीच, फ्लोरिडा इथल्या इव्हेंट सेंटरच्या बाहेर बेघरांनी झोपू नये म्हणून मुलांचं गाणं मोठ्या आवाजात वाजवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर हा दुसरा खटला दाखल करण्यात आलाय.

Story img Loader