देशाच्या वित्तीय क्षेत्रातील आजवरचे सर्वात मोठे विलीनीकरण १ जुलैपासून प्रत्यक्षात लागू झाले आहे. देशातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेमध्ये विलीनीकरण झाले. पण हे विलीनीकरण होण्याच्या एक दिवस आधी एचडीएफसीचे माजी अध्यक्ष दीपक पारेख (Deepak Parekh) यांनी राजीनामा देत निवृत्ती जाहीर केली. यासंदर्भात त्यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेले शेवटचे पत्रदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता पारेख यांचे HDFC जॉईन करतानाचे ऑफर लेटर समोर आले आहे, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका ट्विटर वापरकर्त्याने एक फोटो शेअर केला आहे, जो दीपक पारेख यांना एचडीएफसी बँकेत जॉईनिंग करताना मिळालेल्या ऑफर लेटरचा असल्याचा दावा त्याने केला आहे. या व्हायरल फोटोतील मजकुरानुसार, १९ जुलै १९७८ मध्ये दिपक पारेख डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर रुजू झाले होते. दीपक पारेख यांचा त्यावेळचा मूळ पगार किती होता हे या ऑफर लेटरमध्ये दिसत आहे. पारेख यांचा सुरुवातीचा पगार ३ हजार ५०० रुपये आणि महागाई भत्ता ५०० रुपये होता. तर १५ टक्के एचआरए आणि १० टक्के सीसीए होता. यासोबतच त्यांना पारेख पीएफ, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय लाभ अशा अनेक सुविधांही असल्याचं या व्हायरल लेटरमध्ये दिसत आहे.

हे लेटर सोशल मीडियावर शेअर केल्यापासून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये “खूप छान! हे लेटर कसं मिळालं” असं विचारलं आहे. तर आणखी एकाने त्या काळात तो पगार सुद्धा खूप जास्त होता असं लिहिलं आहे.

तर आणखी एकाने त्या काळाचे ३,५०० रुपयेदेखील खूप जास्त होते असं म्हटलं आहे. तर अनेकांनी हे लेटर पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, दीपक पारेख यांनी शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं, “भविष्यासाठी आशा आणि अपेक्षा ठेऊन रजा घेतोय.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former hdfc chairman deepak parekhs 1978 offer letter viral you will be surprised to see the first salary jap