Former IAS officer First Job Offer Letter Viral : इंजिनिअरिंग केल्यानंतर बहुतेक विद्यार्थी टीसीएस पास करण्याचे स्वप्न पाहतात, परंतु केवळ काही विद्यार्थीच टाटाची ही कठीण परीक्षा उत्तीर्म होऊ शकतात. अशाप्रकारे १९८९ च्या बॅचच्या एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने ४० वर्षांपूर्वी आयआयटी नंतर टीसीएससाठी अर्ज केला होता. ज्यात उत्तीर्ण झाल्यानंतर टीसीएसने त्यांना ४० वर्षांपूर्वी किती पगाराची ऑफर दिली होती याची माहिती त्यांना शेअर केली आहे, रोहित सिंग असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी टीसीएसच्या ऑफर लेटरचा एक फोटो पोस्ट केला आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे, हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

टीसीएसमध्ये ४० वर्षांपूर्वी त्यांना किती होता पगार ?

सेवानिवृत्त आयएएस अधिकारी रोहित कुमार सिंग यांनी पोस्ट केलेल्या ऑफर लेटरवर २६ जून १९८४ अशी तारीख आहे. जे त्यांनी पोस्ट करत लिहिले की, त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टीसीएसच्या मुंबई कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून केली. जवळपास ४० वर्षांपूर्वी त्यांना IIT BHU मध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे टीसीएस मुंबईमध्ये माझी पहिली नोकरी मिळाली. यावेळी त्यांचा महिन्याचा पगार होता १३०० रुपये. यावेळी नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून त्यांच्या कामाच्या ठिकाणावरुन दिसणारे समुद्राचे विहंग दृश्य त्यांना खरोखरचं खूप भारी वाटायचे, असेही त्यांनी नमूद केले.

त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारले की, “आयएएसमध्ये प्रोबेशनर म्हणून तुमचा सुरुवातीचा पगार किती होता?” ज्यावर सिंग यांनी उत्तर दिले की, “२२००.” दुसऱ्या युजरने विचारले, “सर, तुम्ही आता इथे असता तर तुम्हाला किती पगार असता यावर तुमचा अंदाज काय? तुम्हाला संधी मिळाल्यास, तुम्ही पुन्हा ही नोकरी करु इच्छिता का? बस फक्त असचं विचारतोय.” यावर सिंग यांनी उत्तर दिले, “खरंच नाही. आयएएस झाल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये आश्चर्यकारक संधी उपलब्ध होता. पण तुम्ही सामाजिक कार्य करत असता तेव्हा तेच कार्य तुम्हाला अत्यंत आनंददायी अनुभव देत असते.”

सिंह सध्या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे सदस्य आहेत. आयोगाच्या वेबसाइटनुसार, त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

टीसीएसमध्ये सामील झाल्यानंतर, ते न्यूयॉर्कच्या क्लार्कसन युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये मास्टर डिग्री घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले. नंतर त्यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाले.