केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ओमन चंडी हे स्लीपर क्लासने प्रवास करतानाचा हा फोटो आहे. एका सर्वसामान्य माणसासारखाच प्रवास ते करत आहे. व्हिआयपी त्यातून केरळचे माजी मुख्यमंत्री त्यामुळे त्यांना स्लीपर क्लासने प्रवास करताना पाहून अनेक सहप्रवाशांना आश्चर्य वाटले. त्यातल्या एका सहप्रवाशाने त्यांचा स्लीपर क्लासमध्ये असतानाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकला आहे.
कोणताही लवाजमा सोबत न घेता कोट्टायमपासून तिरुवनंतपुरम असा १६० किलोमीटरचा प्रवास त्यांनी शब्री एक्सप्रेसने केला.  ते कोचवर झोपले असताना एकाने त्यांचा फोटो काढून ट्विटरवर शेअर केला आहे. एकीकडे नेत्यांना आलिशान गाड्यांचा ताफा आणि इतर लवाजमा घेऊन प्रवास करताना अनेकांनी पाहिले पण चंडी यांच्या प्रवसाची सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. ओमन चंडी यांनी यापूर्वीही सार्वजिनक वाहतुकीचा वापर करत प्रवास केला होता. जुलैमध्ये कोल्लम ते तिरुवनंतपुरम असा सार्वजनिक बसने प्रवास करतानाचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता.

Story img Loader