बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतो. विविध आणि अनोखे कपडे घालून त्याने अनेकांना हैराण केले आहे. मागे त्याचे एक न्यूड छायाचित्र तुफान व्हायरल झाले होते. छायाचित्रावरून त्याच्यावर टीका देखील झाली होती. अनेक मुद्द्यांवरून चर्चेत राहणारा हा अभिनेता पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. एनर्जेटिक अभिनेता म्हणून ओळख असलेल्या रणवीरने एनबीएचे पूर्व दिग्गज खेळाडू शकील ओ नील यांच्यासोबत खलीबली गाण्यावर ठेका धरला आहे.

अलीकडेच रणवीरने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे पूर्व दिग्गज खेळाडू शकील ओ नील यांची भेट घेतली. यावेळी शकील यांनी रणवीरसोबत पद्मावत चित्रपटातील लोकप्रिय गाणे खलीबली यावर जबरदस्त नृत्य केले. यावेळी शकील यांनी मोठ्या उत्साहात या गाण्यावर ठेका धरला. रणवीरही मोठ्या उत्साहात या गाण्यावर नाचत होता. रनवीरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ८ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

(Viral stunt : भरधाव वाहनांनी धडक देण्यापूर्वीच तरुणाने घेतली उलटी उडी, नंतर थेट..)

याअगोदर रणवीरने एनबीए स्टार जियानिस एंटेटोकोनम्पो यांना रामलीला चित्रपटातील ‘ततड ततड’ या गाण्यावरील नृत्याचे स्टेप्स शिकवले होते. त्यानंतर आता रणवीरने शकील यांच्या बरोबर खलीबलीवर ठेका धरल्याचे दिसून आले. रणवीर सिंहला २०२१ मध्ये भारतातर्फे एनबीएचा ब्रँड अम्बेसेडर बनवण्यात आले होते. तेव्हापासून तो जगातील प्रमुख एनबीए कार्यक्रमांमध्ये दिसून आला आहे.

एनबीएचे पूर्व खेळाडू शकील यांना खलीबलीवर नाचतानाचे पाहून अनेकांना विश्वासच बसत नाहीये. अनेक युजरनी त्यांच्या नृत्याचे कौतुक केले आहे. एकाने तर शकील हे रणवीरच्या चित्रपटात असायला हवे, असे म्हटले. या व्हिडिओवर अभिनेता वरून धवन यानेही प्रतिक्रिया दिली आहे. शकील यांना खलीबलीवर नृत्य करताना पाहून त्याने यास ‘द शाक अटॅक’ असे संबोधले आहे.

Story img Loader