कर्नाटक पोलिसांनी बहरीनच्या एका माजी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या कर्मचाऱ्याने आपल्या कॅन्सरग्रस्त मुलाचे उपचार करण्यासाठी एक अपराध केला आहे. पोलिसांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली. ६१ वर्षीय नजीर अहमद इम्रान उर्फ ​​पिलाकल नजीर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, नजीर यांनी भारतात येण्यापूर्वी ९ वर्ष बहरीनमध्ये पोलिस कर्मचारी म्हणून काम केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६१ वर्षीय नजीर अहमद इम्रान यांना गेल्या १४ वर्षांमध्ये दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. आपल्या मुलाला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर नझीर व्यावसायिक कार चोर बनले आणि त्यातून त्याच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करू लागले. अशोकनगर पोलिसांनी २००८ मध्येही नजीर यांना अटक केली होती. मात्र, यावेळी त्यांची जामीनावर सुटका झाली होती.

मॅगी आणि पाणीपुरीचं विचित्र कॉम्बिनेशन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

तथापि तुरुंगातून सुटल्यानंतरही ते गुन्हा करत राहिले. अलीकडेच, ब्यातरयानपुरा पोलीसांनी, सर्व्हिस सेंटरमधून एसयूव्ही चोरल्याप्रकरणी नजीर यांना अटक केली आहे. हाय ग्राऊंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नजीर यांनी उचललेल्या दोन दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

तपासादरम्यान त्याने मुलाच्या उपचारासाठी हा गुन्हा केल्याचे सांगितले. बनावट कागदपत्रे बनवून ते चोरी केलेली वाहने विकतात. पोलिसांनी सांगितले की, नजीर बेंगळुरू शहर आणि केरळच्या विविध भागातील वाहने चोरी करतात. या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former police officer becomes car thief you will be shocked after knowing the reason pvp