Noida Girl Fight Viral Video: सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी तुम्हाला हसवतात तर कधी आश्चर्यचकित करतात. सोशल मीडियाचा प्रभावही लोकांवर इतका आहे की, जेव्हा कधी एखादी घटना समोर घडते तेव्हा सर्वात आधी खिशातून मोबाईल काढून लोक शूट करणं सुरू करतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मुलांच्या दोन गटांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ आपण अनेकदा पाहिले आहेत. मात्र, इंटरनेटवर एक व्हिडीओ समोर आला आहे, जो तुम्हाला थक्क करून सोडेल. कारण, रस्त्यात अचानक काही मुली एकमेकांशी भिडण्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर आपल्याला नेहमी असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. ज्यामुळेच हे व्हिडीओ पाहण्यात लोकांचा तासन्तास कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चार मुली रस्त्याच्या मधोमध भांडताना दिसत आहेत. तिथे पोलिसही उभे असूनसुद्धा या मुलींची झुंज थांबली नाही. या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रीलसाठी जीव धोक्यात घालणारे तुम्ही पाहिले असतीलच, त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बातम्याही तुम्ही वाचल्या असतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुली रस्त्यावर जोरदार भांडत आहेत आणि या लढतीमागे एक आश्चर्यकारक कारणही आहे.
(हे ही वाचा : VIDEO: याला म्हणतात जुगाड! माठातील पाणी पिण्याची ‘अशी’ सोय पाहून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा Video पाहाच )
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण नोएडाच्या फेज २ मधील आहे. रीलवरील टिप्पणीवरून चार मुलींच्या दोन गटांत वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की, रस्त्याच्या मधोमध जोरदार हाणामारी झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुली रस्त्याच्या कडेला एकमेकांना लाथा मारत आहेत. जवळच एक पोलिसही उभा आहे, पण तोही या मुलींसमोर असहाय्य दिसत आहे.
येथे पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेकांकडून मजेशीर कमेंट येत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “सरकारने रिल्स बनवण्यावर बंदी घातली असती तर बरे झाले असते.” एकाने लिहिले की, “आता फक्त देवानेच या रील बनवणाऱ्यांपासून वाचवावे.”