4 Year Old Rides Royal Enfield In Viral Video: बाईक चालवताना स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात ज्याला लोकांची पसंती मिळते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल. व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा एक जड बाईक चालवताना दिसत आहे. उत्तम बाईकस्वार असल्यासारखा तो बाईक चालवत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.
Royal Enfield Classic 350 या बाईकचे वजन साधारण १९५ किलो इतके आहे. ही बाईक सांभळणे कित्येकदा भल्या भल्यांना जमत नाही तिथे हा ४ वर्षाचा चिमुकला आरामत ही बाईक बॅलन्स करत चालवताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर tranz__moto_hub या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुलाने डोक्यावर हेल्मेट घालून अगदी बाईक रायडर्ससारखा लूक केला आहे. चिमुकल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ केरळमधील असल्याचे समजते.
व्हायरल व्हिडीओमध्ये हा चिमुकला एकटाच गाडीवर बसलेला दिसत आहे. त्याच्यासह एक तरुण व्यक्ती देखील दिसत आहे जो त्याला बाईक सुरु करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर हा चिमुकला एकटाच मैदानावर गाडी चालवताना दिसत आहे. तो मुलगा हसत खेळत अगदी आरामात गाडी चालवताना दिसत आहे. त्याच्यासह असलेली व्यक्ती तो पडू नये यासाठी त्याच्या मागे मागे धावत आहे. ती व्यक्ती या चिमुकल्याचे वडील असल्याचे समजते. लोकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. पण, पालकांनी लहान मुलांना अशा प्रकारे गाडी चालवण्यासाठी देणे अत्यंत धोकादायक आहे. या व्हिडीओवर अनेकांनी टिका केली आहे.
हेही वाचा – पाणीपुरीचे भजी! व्हायरल व्हिडीओ पाहून खाद्यप्रेमी संतापले, म्हणाले, “आतापर्यंतचा सर्वात वाईट प्रयोग…”
व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पसंती दर्शवली आहे आणि कित्येकांनी कमेंटस केल्या आहे. काही लोकांनी लहान मुलांच्या कौशल्याचे कौतूक केले तर काहींनी इतक्या लहान मुलाला गाडी चालवण्यास देणे चूकीचे असल्याचे सांगत. एकाने व्हिडीओवर कमेंट केली की, “वाह, दुर्मिळ दृश्य” तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटले की, “अरे आधी मुलाला मोठे तर होऊ द्या.” तिसऱ्या व्यक्तीने पालकांना सावधान करत सांगितले की, “मुलांना मशीन बाबत सर्वकाही शिकवा आणि त्यांना काही समजत नाही असे समजू नका” तर चौथ्या व्यक्तीने सांगितले की, “त्या लहानमुलाला समजवा की गाडी चालवण्याचे योग्य वय काय आहे?”