Lion Lioness Fight Video: जंगलातील दुनिया ही अतिशय वेगळी आणि विचित्र आहे. कारण तिथे कोण कोणाची आणि कधी शिकार करेल हे सांगणं फार कठीण आहे. इथे फक्त शिकार होणाऱ्यालाच नाही तर शिकारीलाही तितकाच धोका आहे. कारण शिकार करणंही सोपं काम नाही. जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोल्हा झोपलेल्या सिंहाची खोड काढताना दिसून आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वास्तविक जीवनात असे तुम्ही क्वचितच पाहिले असेल. पण असे दृश्य एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे. यांच्या लढाईचा शेवट कसा होईल? आणि यामध्ये नक्की कोण जिंकेल अशीच उत्सुक्ता लोकांना लागली आहे.
सिंह हा किती मोठा शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. वेळ पडली तर तो एकटा हत्तीची सुद्धा शिकार करू शकतो. अन् त्यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. मात्र याच सिंहाशी एका कोल्ह्यानं पंगा घेतला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह मोकळ्या आकाशाखाली निवांत झोपला आहे. यावेळी तिथे एक कोल्हा येतो आणि हळूच सिंहाची शेपटीचा चावा घेऊन पळून जातो. बरं एकदाच नाहीतर अनेकदा तो येतो शेवटी चावतो आणि सिंह जागा झाला की पळून जातो. शेवटपर्यंत कोल्ह्याने धूर्तपणा दाखवत शिकार करण्यापासून स्वत: ला वाचवले.
सिंहाचा आज मूड चांगला होता म्हणून कोल्हा वाचल्याचं नेटकरी म्हणत आहेत.‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर lionsightings नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना प्राण्यांची लढाई व त्यांची हुशारी पाहणे आवडते हे या व्ह्यूज व कमेंट्समधून दिसून येते. अंगावर काटा आणेल असा हा जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जंगलात काही वेळा प्राणी माणसांच्या विचारापलीकडे जाईल अशी भांडणे करतात.