फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस हे त्यांच्या भविष्यातील घटनांच्या भाकितामुळे प्रसिद्ध आहेत. नॉस्ट्राडेमस यांनी ६,३३८ भाकितं केली आहेत. जगाचं शेवट कधी आणि कसा होणार याबाबतही त्यांनी लिहिलं आहे. हिटलरचं राज्य, दुसरं महायुद्ध, ९/११ दहशतवादी हल्ला, फ्रान्स क्रांती यासारख्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला होता. नॉस्ट्राडेमस यांचं निधन २ जुलै १५६६ झालं होतं. काही शतकांपूर्व त्यांनी वर्तवलेली भाकितं काही प्रमाणात खरी ठरत असल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसायला लागला आहे. इतकं वर्ष उलटूनही त्यांच्या भविष्यवाणीची चर्चा आहे.

नवं वर्ष २०२२ बद्दलही त्यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. यात युरोपमध्ये युद्धाचं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. त्यामुळे त्यांचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. कारण आता युक्रेन आणि रशिया दोन देशात युद्ध सुरु झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्य कथनाची चर्चा रंगू लागली आहे. युक्रेन हा पूर्व युरोपातील एक देश आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

यासह आणखी काही भाकीतं वर्तवण्यात आली आहेत. वाचा

  • किम जोंग उन मरणार? : नॉस्ट्राडेमस यांनी या वर्षात प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्तीचा मृत्यूचं भाकित वर्तवलं आहे. सेंचुरियाच्या १४ व्या उताऱ्यात लिहिलं आहे की, “एका शक्तिशाली व्यक्तीच्या मृत्यूने बदल होईल. देशात नवा चेहरा समोर येईल.” नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे या भाकीताचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या प्रकृतीशी याबाबतचं भाकित जोडलं जात आहे.
  • भूकंप : नॉस्ट्राडेमस यांच्या सेंचुरिया तीनच्या तिसऱ्या उताऱ्यात या वर्षी जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा भूकंप दिवसा आल्यास भयानक स्थिती असेल. तसेच यामुळे अनेकांचा मृत्यू होईल.
  • महागाईला सामोरे जावे लागेल : नॉस्ट्राडेमस यांच्या भाकितावर विश्वास ठेवला तर या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेत खूप बदल होणार आहेत. या वर्षी बिटकॉइन आणि सोने-चांदी ही मालमत्ता मानली जाईल. अमेरिकन डॉलरमध्ये मोठी घसरण होईल. जगात महागाई खूप वाढेल, त्यामुळे लाखो गरिबांना उपासमारीने आपला जीव गमवावा लागेल.
  • युरोपियन संघाचं पतन : नॉस्ट्राडेमसच्या मते, ब्रेक्झिट ही फक्त सुरुवात होती. २०२२ मध्ये संपूर्ण युरोपियन युनियन कोसळणार आहे. मात्र ही भविष्यवाणी खरी ठरते का? येत्या काही महिन्यातच स्पष्ट होणार आहे.
  • उल्का पृथ्वीवर धडकणार : नॉस्ट्राडेमसच्या भाकितानुसार २०२२ मध्ये पृथ्वीवर मोठी उल्का धडकणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. यामुले मोठा मोठा विध्वंस होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र नासा या अंतराळ संशोधन संस्थेने असं कोणतंच संकट नसल्याचं सांगितलं आहे.
  • रोबोटचा दबदबा : नॉस्ट्राडेमसच्या भाकितात २०२२ या वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा उल्लेख आहे. मानव जातीवर आता रोबोटचा ताबा असेल असं विश्लेषकांनी मत मांडलं आहे. मोठ्या प्रमाणात संगणीकृत झाल्याने मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याचं गेल्या काही वर्षात पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वी रोबोटच तयार करणार रोबोट अशीही बातमी होती. त्यामुळे याकडेही विश्लेषकांचं लक्ष लागून आहे.

Story img Loader