फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये ते चक्क बिअर पिताना दिसत आहेत, ज्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. फ्रान्स राष्ट्राध्यक्ष एका रग्बी क्लबमध्ये बिअर पित होते, यावरुन वादाला तोंड फुटले आहे. हा व्हिडीओ झाल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रचंड्र ट्रोल केले जात आहे.

अवघ्या १७ सेकंदात बिअर बाटल केली रिकामी

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन टूलूस रग्बी टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये उभे असल्याचे दिसत आहेत. ते टीमला चीअर करण्यासाठी ते इथे आले होते, यावेळी ते आनंदात एक बिअरची बाटली ओपन करतात आणि ती हवेत उंचावतात आणि त्यानंतर अवघ्या १७ सेकंदात ते बिअरची भरलेली बाटली पितात असे दिसतेय. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या खेळाडूही त्यांना उत्साहात ओरडत चिअर करतात. तर काही खेळाडू व्हि़डीओ बनवत असतात. FC च्या अहवालानुसार, टूलूस रग्बी संघाने टॉप १४ चॅम्पियनशिप फायनल जिंकल्याच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले होते. यावेळी मॅक्रॉन यांना लोकप्रिय बिअर ब्रँड- कोरोनाची बाटली ऑफर करण्यात आली होती, जी बाटली त्यांनी अवघ्या काही सेकंदात पिऊन रिकामी केली.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सोशल मीडियावर झाले जबरदस्त ट्रोल

बिअर प्यायल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रपतींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक खूप कमेंट करत आहेत. काही लोक फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या समर्थनार्थ देखील दिसत आहेत. तर राष्ट्राध्यक्ष हे कोणत्याही देशाचा आदर्श असतात. त्यांनी देशातील लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे, म्हणत त्यांच्या अशा वागण्याच्या विरोधात मतप्रदर्शन केले आहे. ग्रीन्स पक्षाचे खासदार सँड्रीन रुसो यांनी म्हटले की, राजकीय नेतृत्व आणि विषारी मर्दानगी एका फ्रेममध्ये दिसत आहे. यापूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते दररोज दुपारच्या जेवणासोबत वाइन पितात. 

Story img Loader