Fraud in the travel industry: आयुष्यात एकदा तरी ‘या’ सात ठिकाणांना भेट द्यायलाच हवी… तुम्ही या ठिकाणी गेलेला नाहीत तर मग कुठे गेलायत? अशा पद्धतीनं मार्केटिंग करत सध्या तरुणाईला आकर्षित केलं जातंय. पूर्वी काही ठरावीकच ट्रॅव्हल कंपन्या होत्या; मात्र आता त्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की, करिअर करणाऱ्यांपासून नवनवीन कल्पना वापरून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्यांची सध्या चलती आहे. हिमालय पर्वतरांगाच नाही, तर किल्ले, गड आणि विविध प्रकारच्या पर्वतांवर आरोहण करण्याच्या पर्यटनात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पूर्वी मे महिन्याच्या सुटीत गावाकडे गेल्यावर डोंगरावर, गड-किल्ल्यांवर जायचो. मात्र, आता यातलाच ट्रेकिंग म्हणत त्याला ‘ट्रेंडिंग’ केलं जातंय. या नव्या ट्रेकर मंडळींच्या इच्छा आणि पावलांना धुमारे फुटतात. इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधब्यातील, जंगलातील, डोंगरातील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की तरुणांना ‘अॅडव्हेंचर’ करावंस वाटतं. अशा वेळेस टूर्सवाले याच तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि तरुण मंडळी ती संधी लुटण्यास डोळे झाकून पुढे सरसावतात आणि इथून पुढे खरा धोका सुरू होतो.

आजच्या घडीला बदलती जीवनशैली आणि प्रत्येकाच्याच डोक्यावर असणाऱ्या तणावामुळे त्यातून बाहेर पडत तणावमुक्त जगण्यासाठी अॅडव्हेंचर पर्यटनाला पसंती दिली जात आहे. देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाच्या आकड्यांचा चढता आलेखच हा ट्रेण्ड पुरता स्पष्ट करतो. त्यामुळे विविध संस्था-संघटना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही याकडे रोख वळवला आहे. करोनाच्या महासाथीनंतर उद्योगाप्रमाणे अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला, यामध्येच पर्यटनाचाही समावेश होताच. चला तर मग सुरुवातीला प्रवास आणि पर्यटनाच्या सध्याच्या ट्रेण्डवर परिणाम करणारा डेटा पाहूयात. Mastercard’s Travel 2022 : Trends & Transition Report नुसार करोना काळात हवाई प्रवास कमी झाला होता; मात्र आता जगभरातील पर्यटक पुन्हा प्रवास करण्यास उत्सुक आहेत. आपल्या सर्वांवर परिणाम करणाऱ्या ट्रॅव्हल इंडस्ट्री ट्रेण्डवर नजर टाकू.

Transport Minister Pratap Sarnaik said private passenger transport providers like Ola Uber Rapido brought under one regulation
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

सध्या लोकांचा विमान प्रवासाकडे कल वाढत असल्याने, फसवणुकीचंही प्रमाण वाढलं आहे. विशेषतः २०२० नंतर याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. प्रवासासंबंधीच्या फसवणुकीत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरपासून पर्यटनस्थळांवर गर्दी व्हायला सुरुवात होते. अशा वेळी प्रत्येक जण आधीच तिकीट बुक करतो, असं नसतं. अनेक लोकांना कामामुळे नियोजनासाठी कमी वेळ असतो. मग अशा वेळी ऑनलाइन तिकीट बुकिंग उद्योग ट्रेण्डचा उद्योगावर कसा परिणाम होतो, जाणून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर तत्काळ तिकिटाला अतिरिक्त पैसे देण्यापेक्षा दलालांकडून तिकीटखरेदीला लोक पसंती देतात. मात्र, इथूनच फसवणुकीला सुरुवात होते आणि त्यामुळे फसवणूक ओळखणे व रोखणे कठीण होते.

मर्चंट रिस्क कौन्सिल ग्लोबल फ्रॉड रिपोर्टनुसार, २०१९ पासून ऑनलाइन पेमेंट फसवणुकीचे प्रकार वाढले असून, फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले जात आहेत. सुरुवातीला मैत्री करून फसवणुकीचे डावपेच आखणं आणि योग्य संधी मिळताच फसवणूक करणं ही त्यांची ठरलेली ‘मोडस ऑपरेंडी’ असते.

ऑनलाइन हॉटेल बुकींगच्या फसवणुकीचे बळी

हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील सूत्रांनी सांगितलं की, १०० हून अधिक पर्यटक (त्यातील बहुतेक पश्चिम बंगालमधील पर्यटक) गेल्या सहा महिन्यांत बनावट वेबसाइट्सवर हॉटेल्स बुक करताना फसले आणि त्यांना पैसे गमवावे लागले. अनेक हॉटेल्सच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करणं आणि टूर पॅकेजेस व प्रेक्षणीय स्थळांवर आकर्षक सवलती देऊन पीडितांना आमिष दाखवणं ही ऑनलाइन स्कॅमर्सची फसवणुकीची पद्धत आहे. फसवणूक करणाऱ्यांनी मुळात अस्तित्वात नसलेल्या हॉटेल्ससाठी बनावट बुकिंग ॲप्लिकेशन आणि पोर्टल्सही तयार केली आहेत. हॉटेल्समधील सी-फेसिंग रूमची किंमत दररोज चार ते १० हजार रुपये असताना घोटाळेबाजांनी याची किंमत दोन ते ४ हजार रुपयांदरम्यान ठेवून ऑफर दिल्याचं समोर आलं आहे.

कोलकाता येथील राकेश हलदर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, ओडिशामधील पुरी येथे एक सी-फेसिंग रूमसाठी एक हॉटेल बुकिंग वेबसाइट पाहिली; ज्यामध्ये त्यांना त्या खोलीची किंमत तीन हजार रुपये दाखवली. त्यानंतर त्यांनी त्या वेबसाईटवरून २ ते ७ नोव्हेंबरदरम्यान एक खोली बुक केली. त्यांना आधी आठ हजार रुपये अॅडव्हान्स भरायला सांगितले, त्यांनी पैसे पाठवले. मात्र, जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा आढळले की, असे कोणतेही हॉटेल अस्तित्वात नाही. त्यानंतर त्यांनी पुरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सुदीप्तो दास या कोलकात्यातील आणखी एका पर्यटकानं जगन्नाथ मंदिराजवळील हॉटेलसाठी ऑनलाइन बुकिंग केलं आणि पाच हजार रुपये ॲडव्हान्स देऊन ३ नोव्हेंबरसाठी दोन खोल्या बुक केल्या. त्यानंतर हॉटेल शोधताना त्यांच्या लक्षात आलं की, ते खातं सायबर फसवणुकीचे आहे. दास यांनी मात्र कोणतीही पोलीस तक्रार दाखल केली नाही.

हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ ओडिशाचे अध्यक्ष जे. के. मोहंती यांनी सांगितलं की, अशी अनेक प्रकरणं आढळून आली आहेत; ज्यात पीडित पोलीस ठाणे आणि न्यायालयाशी संबंधित होणाऱ्या त्रासामुळे कोणीही तक्रार करीत नाही. पुरी पोलिसांनी सांगितलं की, ते हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटकांना सायबर सुरक्षेच्या उपायांबद्दल जागरूक करीत आहेत. “ऑनलाइन हॉटेल बुकिंग फसवणुकीला आळा घालण्यासाठी आम्ही पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही पर्यटकांना पुरेशी खबरदारी घेण्याची विनंती करतो,” असे पुरीचे एसपी कंवर विशाल सिंह म्हणाले.

गूगल मॅप वापरून हॉटेल कसे बुक करायचे?

फसवणूक टाळण्यासाठी काही पर्याय तु्म्ही वापरू शकता. त्यातीलच एक म्हणजे गूगल मॅप. गूगल मॅप फक्त लोकेशन शोधण्यासाठीच मदत करतं असं नाही, तर हे अॅप हॉटेल आणि फ्लाइटच्या बुकिंगसाठीही मदत करतं. आता ते कसं ते जाणून घेऊ. सर्वांत आधी हॉटेल शोधण्यासाठी आणि बुक करण्यासाठी तुमचं गूगल मॅप ओपन करा. तुम्हाला जिथे जायचं आहे ते ठिकाण निवडा. त्या ठिकाणी असलेली जवळपासची हॉटेल्स तुम्हाला दिसतील. तुम्हाला हॉटेल्सचे आणखी पर्याय हवे असतील, तर पुन्हा रिफ्रेश करा. त्यानंतर तपशील पाहण्यासाठी हॉटेलवर क्लिक करा आणि थेट किंवा बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे बुक करा. याच प्रकारे तुम्ही विमानाची तिकिटेही बुक करू शकता.

हेही वाचा >> ‘बंटी तुझा साबण स्लो आहे का?’ भारतात तुफान विक्री होणारा ‘हा’ साबण अमेरिकेत का झाला बॅन?

त्यामुळे अशा स्वरूपाचे व्यवहार करताना खात्री करा. सावधानता बाळगा. शंका किंवा संशय घेऊन व्यवहार केल्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण, अनेकदा विश्वास संपादन करून फसवणूक केली जाते. ती टाळण्यासाठी कशावरही विश्वास ठेऊ नका. आधी खात्री करा. फसवणूक झाल्यास cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करावी.

Story img Loader