प्रत्येकाच्या जगण्याच्या संकल्पना या वेगळ्या असातात, कोणाला साधं राहणीमान आवडतं, तर कोणाला मजा मस्ती आणि रंगीबेरंगी दुनियेत रमायला आवडतं, तर काहींना नेहमीचच कंटाळवाणं जगण्यापेक्षा थ्रील अनुभवायला आवडतं, आयुष्यात रिस्कच घेतली नाही थ्रीलच अनुभवला नाही तर ते जगणं कसलं? असा विचार करणारे जगात अनेक आहेत.
वाचा : घर की खुराडा? तरीही लोक देतात २० हजार घरभाडे
वाचा : प्राण्यांना रस्ता क्रॉस करायला खास ‘ब्रिज’
फ्रेंच आर्टिस्ट अब्राहम पोनिचव्हेल त्यातलाच एक. सध्या सोशल मीडियावर त्याची खूपच चर्चा आहे. १२ टन वजनाच्या खडकात त्याने बसण्यासाजोगी जागा कोरली, आणि या खडकात त्याने स्वत:ला ७ दिवस बंधिस्त करुन घेतले. या खडकात साधी हातपाय देखील हलवायला जागा त्याने सोडली नाही. फक्त पाणी ऑक्सिजन आणि सूप एवढाचा काय तो खाद्यपुरवठा त्याला होत होता. सात दिवसांनंतर त्याला या खडकातून बाहेर काढण्यात आले आहे. तब्येतीने जरी तो ठिक असला तरी त्याच्या काही वैद्यकिय चाचण्या करण्यात येणार आहे. अब्राहमने असे प्रकार काही पहिल्यांदाच केले असे नाही. याआधीही त्याने असे अनेक प्रयोग केले होते. त्याला पाहायला चाहत्यांनी गर्दी केली होती. आता यातून काय साध्य झालं त्याचे त्यालाच ठावूक पण जगात काहीतरी हटके करणा-यांची काही कमी नसते हे नक्की.