Remi Lucidi Death: सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. गगनचुंबी इमारतींवर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेमी लुसिडी या स्टंटमॅनचा हाँगकाँगमध्ये ६८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रेमी लुसिडीने मृत्यूच्या एक तास आधी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

खोटं बोलून इमारतीत प्रवेश केला

nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
producer k p chowdary dies by suicide in goa
प्रसिद्ध निर्मात्याने ४४ व्या वर्षी गोव्यात केली आत्महत्या, ६५० कोटी कमावणाऱ्या सुपरहिट सिनेमाची केलेली निर्मिती, नेमकं काय घडलं?
Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू

हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना रेमी लुसिडीला अनेकांनी इमारतीवर जाताना पाहिले होते. टॉवरमध्ये प्रवेश करत असताना त्याला गेटवरील सुरक्षा रक्षकाने अडवले होते. मात्र, सुरक्षा रक्षकाशी खोटं बोलून त्याने टॉवरमध्ये प्रवेश घेतला. त्याने सांगितले की, तो ४० व्या मजल्यावर आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला आहे. मात्र, संबंधित मित्राने ओळख न दाखवल्यामुळे रेमी लुसिटी खोटं बोलत आहे हे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर, सुरक्षा रक्षकांनी त्याला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत लुसिडी लिफ्टमध्ये शिरला होता.

अपार्टमेंटच्या खिडकीतून मागितली होती मदत

सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेमी लुसीडी ४९ व्या मजल्यावर येताना आणि नंतर इमारतीच्या वरच्या पायऱ्या चढताना दिसला. तो संध्याकाळी ७ .३८ वाजता कॉम्प्लेक्सच्या पेंटहाऊसच्या खिडकीवर मदतीसाठी हात ठोठावताना दिसला. ज्यामुळे तिथे काम करणारी मोलकरीण घाबरली. तिला पाहून तोही घाबरला आणि त्याचा पाय घसरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुसिडी पेंटहाऊसच्या बाहेर अडकला होता आणि मदतीचा हात मागत होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: लव्ह मॅरेजसाठी गर्लफ्रेंडला पळवायला आला तरुण, पण बाइकने ऐन वेळी घात केला अन्…

दरम्यान पोलिसांना तेथून लुसीडीचा कॅमेरा सापडला आहे. त्यात डेअरडेव्हिलच्या स्काय स्क्रॅपर्सवर शूट केलेले धोकादायक व्हिडिओ होते.

Story img Loader