Remi Lucidi Death: सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. गगनचुंबी इमारतींवर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेमी लुसिडी या स्टंटमॅनचा हाँगकाँगमध्ये ६८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रेमी लुसिडीने मृत्यूच्या एक तास आधी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा