ताजमहालला पाहिल्यावर आपल्यासाठी देखील कोणीतरी असाच ताजमहाल बनवावा असा विचार मनात आल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या प्रिय पत्नीसाठी बनवलेली ही जगातील सुंदर वास्तू कोणीच बनवू नये म्हणून शहाजहानने कारागीरांचे हात तोडले होते अशा अनेक कथा ऐकिवात आहे. तसा ताजमहाल कोणीच बनवू नये एवढीच त्याची इच्छा होती. पण आग्रामधील तुरुंगात राहणा-या एका फ्रेंच कैद्याने मात्र ही कलाकृती आपल्या प्रिय पत्नीसाठी बनवण्याचे धाडस केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘ती’ने दाखवून दिला नवा रस्ता, वाचून बदलेल ‘अरेंज्ड मॅरेज’कडे पाहण्याचा दृष्टीकोन

उत्तर प्रदेशमधील एका परदेशी कैद्याने आपल्या पत्नीसाठी आगपेटीच्या काड्यांपासून सुंदर ताजमहाल बनवला आहे. हा ताजमहाल आपल्या पत्नीपर्यंत पोहचवण्याची त्याची शेवटची इच्छा आहे. अल्बर्ट पास्कल नावाच्या फ्रान्सचा नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करीखाली सोनोली सिमारेषेवर पकडण्यात आले. युपीतल्या महराजगंज जिल्ह्यातील तुरूंगात तो शिक्षा भोगत आहे. आपल्या शिक्षेच्या काळात त्याने आपल्या प्रिय पत्नीसाठी हा ताजमहाल बनवला. अल्बर्टला एड्स झाला आहे, त्याचप्रमाणे जेलमध्ये राहून त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे त्यामुळे त्याला नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी तुरूंगातील प्रशासनाने त्याच्या कलागुणांना वाव देण्याची संधी दिली आहे.

वाचा : बहारिनचे दिलदार परराष्ट्रमंत्री, मोलकरणीचे मानले आभार

तरुंगातील अन्य दोन कैद्यांच्या मदतीने अल्बर्टने हा ताजमहाल बनवला आहे. हा ताजमहाल बनवण्यासाठी ३० हजार काड्या आणि दोन किलो फेव्हिकॉल वापरण्यात आला आहे. हा ताजमहाल आपल्या पत्नीपर्यंत फ्रान्सला पोहचवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.