सेल्फीचा नाद कधी कधी चांगलाच नडतो, असा अनुभव प्रत्येकाला कधीना कधी तरी आलाच असेल. सेल्फीच्या नादात किती अपघात झाले अन् कित्येकांचे जीव गेले पण सेल्फीचा नाद अनेकांना सोडवत नाही. सेल्फी घेणे काही वाईट नाही पण प्रसंग, वेळ पाहून सेल्फी घेतलेला बरं. पण नेमका हाच नियम एका महिलेने पाळला नाही. तिने चक्क मगरीसोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्न केला अन् हे तिच्या जिवाशी बेतले. मगरीने चक्क तिच्या पायाचा चावा घेतला. शेवटी जीवावर आले ते पायावर बेतले असे म्हणून या महिलेने काढता पाय घेतला.
वाचा : ‘टायटॅनिक’ हिमनगावर आदळून बुडाले नव्हते
थायलँडमधल्या खाओ ये राष्ट्रीय उद्यानात हा प्रकार घडला. येथे असलेल्या मगरीसोबत मुरियल बेनेटुलिएर नावाच्या महिलेने फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मगरीसोबत सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतू शकतो हे माहित असून सुद्धा या महिलेने नकोइतके धाडस केले. यातच तिचा पाय घसरला आणि मगरीने तिच्यावर हल्ला केला. मगरीने तिच्या पायाचा चावा घेतला तसेच अनेक गंभीर दुखापती तिला झाल्या. या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानात ठिकठिकाणी सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत पण असे असताना या महिलेने निष्काळजीपणा केला असे अधिका-यांनी सांगितले.
वाचा : सैबेरियाच्या गोठवणा-या थंडीत प्रवास करणारी निधी तिवारी ठरली पहिली भारतीय महिला