Fridge Falls on A Girl : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका चिमुकलीच्या अंगावर चक्क फ्रिज पडतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्याबरोबर अपघात घडण्याची शकते त्यामुळे लहान मुलांबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकलीच्या अंगावर चक्क फ्रिज पडतो. (Fridge Falls on A Girl shocking video Viral on social media)
चिमुकलीच्या अंगावर पडला भलामोठा फ्रिज
हा व्हायरल व्हिडीओ एका दुकानातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मुलगा सुरुवातीला फ्रिजजवळ येतो आणि फ्रिज उघडतो. त्यानंतर चिमुकली सुद्धा येते आणि ती सुद्धा फ्रिजचा दरवाजा उघडते. फ्रिजचा दरवाजा उघडल्यानंतरही ती दरवाज्याला स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न करते. पुढे तिच्या अंगावर भला मोठा फ्रिज पडतो. लगेच बाजूला उभा असलेला मुलगा ओरडतो आणि लोक धावून येतात आणि या चिमुकलीच्या अंगावरील फ्रिज उचलतात. सुदैवाने बाजूला उभा असलेल्या मुलाला कोणतीही दुखापत होत नाही. त्यानंतर हा व्हिडीओ येथेच संपतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
Dead Guy Hub या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला आशा आहे की ती ठीक असेल. नशीब चांगले की फ्रिजचे दरवाजे उघडे होते.” तर एका युजरने लिहिलेय, “जेव्हा मोठे आजुबाजूला नसतात तेव्हा लहान मुले असे वागतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “याच कारणामुळे लहान मुलांना कधीही एकटे सोडू नये.”
काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक चिमुकली रस्त्यावरून पळताना ट्रकखाली चिरडली होती. अनेकदा लहान मुले कोणताही विचार न करता रस्ता ओलांडताना दिसतात. अशात पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. ही घटना उज्जैन येथील होती. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला होता.