Viral Video : सोशल मीडियावर मैत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या फ्रेंडशिप डे निमित्त जुने व्हिडीओसुद्धा पुन्हा चर्चेत येत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचे मित्र अचानक येतात आणि त्याला दारू पाजतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, नवरदेव आणि नवरी लग्नाच्या स्टेजवर उभे असतात. अचानक नवरदेवाच्या मित्रांचा एक ग्रुप स्टेजवर येतो. त्यांच्या हातात एक पिशवी असते. त्या पिशवीमधून हे मित्र एक ग्लास बाहेर काढतात आणि नवरेदेवाच्या हातात देतात. पुढे त्या ग्लासमध्ये दारू आणि पाणी ओततात आणि नवरदेवाला दारू प्यायला सांगतात. बाजूला उभी असलेली नवरी हा सर्व प्रकार बघत असते. नवरीला हे सर्व आवडत नाही, हे तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाववरुन दिसून येते. नवरदेवाला कळत नाही की काय करावं आणि हा व्हिडीओ इथेच संपतो.

हेही वाचा : “ये दोस्ती हम नही तोडेंगे …”; चप्पल घालण्यासाठी दोन मद्यपी मित्रांची तारेवरची कसरत; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

__dj_rahul_edits या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “भावाचं लग्न मोडते वाटतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “असे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे” आणखी एका युजरने लिहिले, ” काय फालतूगिरी आहे.”