Accident video: दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल मित्रा जिंकलस!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मृत्यू कोणालाही कुठेही, कधीही गाठू शकतो. अनेकदा लोक नकळत या अपघातांचे बळी ठरतात. कधी इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचतात, तर कधी या अपघातांमुळे त्यांना जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून वाहून जाणाऱ्या मित्राला वाचवलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पुलावर काही तरुण उभे आहेत. तर याच पुलाच्या खालून प्रचंड पाणी वाहत आहे, या पाण्याला इतका वेग आहे की कोणीही प्रवाहाबरोबर सहज वाहून जाईल. अशीच घटना यावेळी घडली, यामध्ये एक तरुण या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता. मात्र हे पाहून त्याचा मित्र या पुलावर आला आणि क्षणाचाही विलंब न करता, त्या तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करु लागला. तो वाहत येत असल्याचं पाहून तरुणानं एक कपडा खाली टाकला, यावळी वाहत येणाऱ्या तरुणानं तो कपडा पकडला आणि तो बचावला. स्वत:च्या जीवाची बाजी लावून त्यानं आपल्या मित्राचे प्राण वाचवले. मित्राने दाखवलेल्या धाडसामुळे केवळ या तरुणाचा जीव वाचला अन्यथा तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> धबधब्याच्या टोकावर पोहचला…,पण एका चुकीने खेळ खल्लास झाला; तरुणाचा ‘हा’ VIDEO पाहून उडेल थरकाप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर laughtercolours नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या भावनिक कमेंट केल्या आहेत. तर अशा प्रकारे पटकन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून मित्राला वाचवणाऱ्या व्यक्तीचे नेटकऱ्यांनी आभरा मानले आहेत.