Brutal Accident Video Viral: मित्र विचार करूनच निवडावेत, असं अनेकदा सांगितलं जातं. कारण- सुखाच्या वेळी सगळेच साथ देतात; पण दु:खात जो साथ देतो, तो खरा मित्र. वाईट प्रसंगी जो आपल्यामागे खंबीरपणे उभा राहतो, तो खरा मित्र.
आपण जेवढी मस्ती, मस्करी मित्रांबरोबर करतो, तेवढी इतर कोणाबरोबर करीत नाही. पण, मस्ती करताना काळ-वेळही बघणं गरजेचं आहे आणि हे ज्याला कळत नाही, त्याच्यावर कधी ना कधी वाईट परिस्थिती ओढवते. काही जण मस्करीमध्ये इतके मग्न होतात की, त्यांना आजूबाजूचं भान राहत नाही. कधी कधी ही मस्करीच काहींच्या जीवावरदेखील बेतते.
सध्या अशीच घटना एका ठिकाणी घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत मित्राच्या मस्करीमुळे जीव पणाला लागला.
मित्राची एक चूक पडली महागात
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, दोन मित्र रस्त्यावर मस्ती करताना दिसत आहे. वर्दळ असलेल्या या रस्त्यावर दोन मित्र धावताना दिसतायत. एक मित्र दुसऱ्याचा पाठलाग करीत आहे आणि दुसरा त्याच्यापासून लांब पळत आहे.
गाड्यांच्या गर्दीत आजूबाजूचं भान न ठेवता, त्यांची मस्ती सुरू आहे. पण, ही मस्ती शेवटी एकाच्या जीवावर बेतली आहे. लांब पळताना अचानक भरवेगात आलेल्या गाडीनं एका मित्राला उडवलं. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ @roadsafetycontent या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर ‘रस्ता ही मस्करी करण्याची जागा नव्हे’, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एवढे मोठे झाले असून, पैशाची अक्कल नाही यांना.” दुसऱ्याने, “मस्करी जीवावर बेतली”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “असा मित्र नसलेलाच बरा.”