लग्नाचे सीझन अजून काही संपलेले नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वधू-वरांशी संबंधित व्हिडीओ इंटरनेटवर खूप पसंत केले जातात. लग्नादरम्यान वधू-वरांसोबत काही मजेदार गोष्टी घडल्या तर ते लोकांना बघायला खूप आवडतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मित्रांनी वराला ज्यूसमधून पाजली दारू

सध्या लग्नाचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही मजा येईल. दरम्यान हा व्हिडीओ वधू-वर आणि वराच्या मित्रांशी संबंधित आहे. व्हिडीओमध्ये वराचे मित्र कुठल्यातरी कोपऱ्यात दारू पिताना दिसत आहेत. दरम्यान, वराच्या मित्रांना काय करावे हे समजत नाही, त्यातील एक मित्र कुठूनतरी सिरिंज घेऊन येतो. वराचा मित्र या सिरिंजच्या मदतीने ‘स्लाइस’ पॅकेटमध्ये दारू भरतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वराचे मित्र स्लाइसच्या पॅकेटमध्ये दारू भरल्यानंतर वराला घेऊन जातात आणि पिण्यासाठी देतात. वरही मोठ्या आनंदाने स्लाइसमध्ये भरलेली दारू पिताना दिसत आहेत. जेव्हा वराने पहिला घोट घेतला तेव्हा त्याला कळते की ते दारूने भरलेले आहे. त्यानंतर तो आतून आनंदी होतो. त्यानंतर वर त्याच्या मित्रांकडे पाहून हसतो. हे पाहून नववधूही ‘स्लाइस’ पिण्यासाठी मागवते.

दरम्यान या व्हिडीओतील सर्वात मजेदार गोष्ट येथे घडते. वास्तविक, वधूने कधीही दारू प्यायली नाही. त्यामुळे स्लाइसमध्ये भरलेली दारू पीत असताना त्यात दारू भरली आहे हेही कळत नाही. वधूचे हावभाव बघून तिला स्लाइसमध्ये भरलेल्या दारूची जाणीव झाली असेल असे वाटत नाही. नववधू देखील मजेमध्ये एक किंवा दोन घोट दारू पिते. त्याचसोबत मजेशीर प्रतिक्रिया देत मित्रांचे आभार मानते.

weddingbells2022_या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओला अधिक पाहिले जात आहे आणि खूप पसंत देखील केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friends gave liquor to the groom by putting him in the box of slice it was the bride reaction scsm