कुटुंबीयांसह आपण कितीही फिरलो किंवा कितीही मजा-मस्ती केली तरी मित्रांबरोबर फिरण्यात जी मज्जा येते ती वेगळीच असते. तुम्हाला ही असेच वाटत असेल ना? कारण मित्रांबरोबर जेव्हाही आपण कुठे जातो तेव्हा खूप मजा करतो, कोणाचेही कसले बंधन नसते आणि कोणी अडवणारे नसते. मित्रांबरोबर ट्रिपला गेल्यावर एकापेक्षा एक मजेशीर किस्से घडत असतात जे आयुष्यभर आपल्या आठवणीमध्ये राहतात. जेव्हा या आठवणी आपण पुन्हा आठवतो तेव्हा खूप हसतो आणि आपल्याला प्रचंड आनंद होतो. घरच्यांबरोबर कुठेही फिरायला गेलो तर एवढी मस्ती करता येत नाही त्यामुळे आपल्याला फार मज्जा येत नाही. सोशल मीडियावर आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामुळे या मित्रांची ट्रिप कायम लक्षात राहण्यासारखी असेल हे स्पष्टपणे समजते.
व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला दिसते की, एका उंच खडकाच्या टोकावर दोन-तीन मुले बसलेले आहेत आणि एक मुलगा त्याच खडकावरून खाली लटकत आहे. खडकावर बसलेल्या मुलांनी त्याचा हात पकडला आहे. तो मुलगा अक्षरश: हवेत लटकत असल्याचे दिसते. जर चूकुनही त्याचा हात सटकला तर तो दरीत कोसळेलच असाच भास होतो पण हे सर्व कमेऱ्यामॅनने पूर्ण फ्रेम न दाखवल्यामुळे वाटते. खरं तर त्या तरुणाला जमिनीवर उतरता येईल इतक्या कमी अंतरावर तो लटत असतो. त्याला उतरता येत नाहीये हे पाहून त्याचे दोन मित्र त्याच्या मदतीला येतात आणि चालत चालत तो लटकत असलेल्या खडकाखाली उभे राहतात. दोन्ही हातांनी त्याचे पाय पकडतात आणि त्याला जमिनीवर उतरण्यासाठी आधार देतात.
हेही वाचा – तुम्ही कधी असा विचित्र आवाज ऐकलाय का? ‘या’ पक्ष्याचे ‘असूरी हास्य’ ऐकून बसेल धक्का! पाहा Viral Video
जेव्हा इंटरनेट यूजर्सनी हा व्हिडिओ व्हायरल पाहिला तेव्हा सुरुवातीला त्यांचा श्वास काही क्षण अडकला होता. परंतु संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ही कॅमेरामनची कला आहे. यामुळेच आता बहुतेक लोक या ठिकाणाबद्दल विचारत आहेत, जेणेकरून त्यांनाही या ठिकाणी जाऊन असे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करता येतील.
हेही वाचा – “आईवर ओरडू नका”; पालकांच्या भांडणात चिमुकलीने घेतली धाडसी भूमिका, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
हा व्हिडिओ @adnan_babar_962 ने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- “पूर्ण व्हिडिओ पहा.” या व्हिडिओला आतापर्यंत22 लाख50 हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले असून3 कोटींहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे.
कमेंमध्ये अनेकांनी, “ही जागा कोणती आहे?” असे विचारले तर काही जण म्हणाले की,”भाऊ, तू तर आधीच जीव घेतला होतास” एकूणच, या व्हिडिओने लोकांना सांगितले की सोशल मीडियावर दिसणारे सर्व काही खरे नसते. म्हणतात “दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” या म्हणीची प्रचिती देणारे हा उत्तम उदाहरण आहे.