Viral video: दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. मित्र हे आयुष्याचं टॉनिक असतात, डॉक्टरांच्या औषधांनी जी ताकद येणार नाही ती फक्त मित्रांमध्ये वेल घालवण्यानं येते. मैत्री हे मानवी जीवनातले महत्त्वाचे नाते आहे. केवळ जन्मामुळे जोडले न जाणारे आणि तरीही आयुष्यभर घट्ट राहील, असे नाते मैत्रीचे असते. लहानपणापासूनचा एखादा शाळूसोबती असो की, गल्लीत उठताबसता सतत सोबत असणारा सवंगडी असो. अशाच काही मित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मैत्रीची अशीच ताकद दाखवणारा हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मित्राला वाचवण्यासाठी मित्रांची धडपड

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”

आज स्मार्टफोन वापरणाऱ्या आणि इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येकाचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी समाजमाध्यमांवर असंख्य मित्र आहेत. मात्र प्रत्यक्षात हाकेला धावून येणारे हे मोजकेच. ‘थ्री इडीयट्स’ हा एकेकाळी जोरदार गाजलेला चित्रपट, यामध्ये राजूनं आत्महत्या केल्यानंतर त्याचे मित्र त्याला त्यातून बाहेर काढताना कसे प्रयत्न करतात हे आपण सर्वांनीच पाहिलं. यावेळी असे मित्र प्रत्येकाला हवे असे आपल्याला वाटलं होतं. दरम्यान अशाच काही मित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

६ वर्षे मित्र कोमात

आश्रय भाटिया नावाचा हा मुलगा. जो गेली ६ वर्षे कोमात आहे. त्याला कोमातून बाहेर आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहे. त्याच्या मित्रांचीही धडपड सुरू आहे. त्याचे मित्र दररोज हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्याला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न करतात. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्याचे सगळे मित्र मैत्रीणी त्याच्या बेडभोवती उभे आहेत आणि त्याच्याशी हातवारे करुन बोलायचा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. “ए उठ ना यार, सर्वजण बोलतात आश्रय किती स्ट्राँग आहे, प्रत्येक जण तुला टाइगर बोलतात. माझ्याकडे जितके पैसे आहे ना ते तुझ्या बुटांवर खर्च करू. तुझ्याकडे गोल्ड बुटं असतील. तू फेमस होशील.” असं काय काय ही दोन्ही मुलं बोलताना दिसतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ झाडावर बसलेल्या माकडावर बिबट्याचा हल्ला; एक चूक अन् खेळ खल्लास, शेवट बघाच

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या भावनिक कमेंट केल्या आहेत.

Story img Loader