Viral video: दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. मित्र हे आयुष्याचं टॉनिक असतात, डॉक्टरांच्या औषधांनी जी ताकद येणार नाही ती फक्त मित्रांमध्ये वेल घालवण्यानं येते. मैत्री हे मानवी जीवनातले महत्त्वाचे नाते आहे. केवळ जन्मामुळे जोडले न जाणारे आणि तरीही आयुष्यभर घट्ट राहील, असे नाते मैत्रीचे असते. लहानपणापासूनचा एखादा शाळूसोबती असो की, गल्लीत उठताबसता सतत सोबत असणारा सवंगडी असो. अशाच काही मित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मैत्रीची अशीच ताकद दाखवणारा हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा