Wild Animal Viral Video : हजारो वर्षांपूर्वी जंगलात डायनासोरने छोट्या मोठ्या प्राण्यांच्या शिकारीचा धुमाकूळ घातला होता. डायनासोरच्या गोष्टी ऐकतानाही भल्या भल्यांच्या अंगवर काटा येतो. जर डायनासोर जंगलात फिरताना प्रत्यक्षात दिसला, तर पळता भुई झाल्याशिवाय राहणार नाही. जंगल सफारी करताना काही लोकांना वाघ, सिंह, बिबट्यासारखे प्राणी नेहमीच दिसतात. पण वाईल्ड फोटोग्राफ्री करणाऱ्या एका तरुणाला चक्क डायनासोरसारखाच एक प्राणी जंगलात फिरताना दिसला. हा प्राणी इतका खतरनाक आहे की, त्याची तुलना थेट डायनासोरशीच केली जात आहे. कारण त्या प्राण्याचा तोंड एखाद्या भयानक डायनासोरसारखाच असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्राण्याचा थक्क करणारा व्हिडीओ @ mitchellburns नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, हा प्राणी डायनासोरसारखा दिसतो. पण हा डायनासोर नसून एक विचित्र सरडा आहे. उत्तर क्विन्सलॅंड प्रदेशात या प्रजातीचे सरडे जंगलात फिरत असतात. पण या सरड्याला शोधणं खूपच कठीण असतं. कारण उंच झाडांच्या छतावर ते लपलेले असतात. पण उन्हाळ्यात या जातीचे सरडे जमिनीवर सरपटताना दिसतात. कारण ते प्रजनन करण्यासाठी जमिनीवर मुक्त संचार करत असतात. या सरड्याचं तोंड आणि नाक इतकं भयानक असतं की, त्यांना पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात.

नक्की वाचा – Video : बापरे! घराच्या अंगणात आलेल्या किंग कोब्राला चक्क आंघोळच घातली, पण फण्याला हात लावला अन्…

इथे पाहा व्हिडीओ

जंगल सफारी करताना वन विभागाकडून नेहमीचा हिंस्र प्राण्यांपासून दूर राहण्याचं आवाहन पर्यटकांना केलं जात. कारण जंगलात असलेले खतरनाक प्राणी कधी कुणावर जीवघेणा हल्ला करतील, याचा अंदाज लावणं कठीण असतं. वाघ, बिबट्या, सिंहांसारखे प्राणी माणसांवर झेप घेऊन काही सेकंदातच त्यांच्या फडशा पडतात. त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या प्राण्यांसोबत खेळ करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखंच असतं. वन्य प्राण्यांच्या हल्लात माणसांची शिकार झाल्याच्या अनेक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यामुळे जंगलतील प्राण्यांपासून चाक हात लांब राहून स्वत:च्या जीवाचं रक्षण करणेच योग्य ठरु शकतं.