संघर्षाच्या जोरावर एक छोटा बेडूक भयंकर सापाच्या तोंडात जाऊनही निसटला, हे ऐकून विश्वास बसत नाही. पण, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही विचित्र घटना स्पष्टपणे दिसत आहे. बेडकाच्या या संघर्षाला लोक सकारात्मकतेने घेत आहेत. हा व्हिडीओ छत्तीसगड केडरच्या एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यानेही त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे, ज्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानली नाही हार

जो हार मानत नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवतो, तो संघर्षाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या आव्हानांनाही तोंड देऊ शकतो. बेडकासारखा छोटा प्राणी आजकाल इंटरनेटवर हजारो लोकांना हे शिकवत आहे. एका भयंकर आणि अवाढव्य सापाने त्या बेडकाचा पाय तोंडात ठेवला होता, पण तो बेडूक हार न मानता स्वतःवर आलेल्या संकटाला तोंड देत राहिला आणि अखेर त्याच्या संघर्षाला यश आले आणि सापाला पराभवाचा सामना करावा लागला.

(हे ही वाचा: गांजाच्या आहारी गेलेल्या मुलाला आईने दिली शिक्षा; खांबाला बांधून डोळ्यात टाकली मिर्ची पावडर; Video Viral)

कसा वाचला बेडकाचा जीव?

हा ३४ सेकंदांचा व्हिडीओ दाखवतो की, बेडकाने शेवटच्या श्वासापर्यंत आपला जीव वाचवण्यासाठी शक्तिशाली सापाशी झुंज दिली. सापाने बेडकाचा एक पाय तोंडात ठेवल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पण, लोखंडी गेटवर बेडूक पुढे सरकत राहतो. बेडकाने लोखंडी गेटवरची आपली मजबूत पकड सोडली नाही आणि सापाच्या वरच्या दिशेने पुढे जात राहिला.

(हे ही वाचा: हजारो फूट उंचीवर बंद पडले हेलिकॉप्टर, इंजिन सुरू करण्यासाठी पायलटने हवेतच बाहेर येऊन…;बघा Viral Video)

बेडकाने दिला आयुष्यातील खूप मोठा धडा

सुरुवातीला साप बेडकाची धडपड पाहून बेडूक जिंकेल असे कोणीही म्हणू शकत नव्हते. पण, बेडकाने सर्व शक्यता आणि आशंका खोट्या ठरवल्या. जसा तो तो सापाच्या तोंडातून बाहेर पडतो तसा पळून जातो. हा बेडूक जीवनाच्या लढाईत हरायला शिकला नसावा. तो इतका वेगाने गेला की साप खूप मागे राहिला.

(हे ही वाचा: Viral: कलेशी चिकटून राहिलेल्या २० वर्षीय कलाकाराचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले “दबावाला न जुमानता…”)

(हे ही वाचा: उद्यानात सापावर मांजरीने केला हल्ला, Viral Video ची सोशल मीडियावर होतेय चर्चा)

“संघर्ष या स्तराचा असेल तर….”

छत्तीसगड केडरचे वरिष्ठ IAS अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “संघर्ष जर या पातळीचा असेल तर तुम्हाला जिंकण्यापासून काहीही रोखू शकत नाही”. या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हाच व्हिडीओ IFS सुसंता नंदा यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कधीही हार मानू नका’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frog defeated the snake with struggle ias officer shared video goes viral ttg