Shocking video: बेडूक आणि साप हे एकमेकांचे पक्के वैरी मानले जातात. साप बेडकाला खातो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. म्हणून बेडूक सापापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. पण एका बेडकाने अशी हिंमत दाखवली आहे. की तुम्ही व्हिडिओ पाहून थक्क व्हाल. साप आणि बेडकाच्या भांडणाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका साप आणि बेडकाच्या भांडणाबद्दल सांगणार आहोत. पण या भांडणाची खास गोष्ट अशी आहे की या भांडणात चक्क बेडकाचा विजय झाला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. या दोघांच्या फाईटींगचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झालाय. साप आणि बेडकाच्या लढाईमध्ये कायम सापाचा विजय होतो. साप बेडकाला खातो हे आपल्याला माहीत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

या लढाईत चक्क बेडूक जिंकला आहे. हा बेडूक हिरव्या रंगाचा आहे. त्याने कोब्रा सापासोबत चालेल्या भांडणात सापालाचं खाऊन टाकलं आहे. या बेडकाने फक्त ३७ सेकंदात कोब्रा सापाला खाऊन फस्त केलं आहे. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमध्ये कोब्रा साप बेडकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की एका मोठ्या बेडकाने कोब्राला अर्धा गिळला आहे, पण गोष्ट इथेच संपत नाही. सामान्यत: बेडूक कोब्राचा शिकार होताना दिसतो, परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रकरण पूर्णपणे उलट आहे. आपली ताकद दाखवत बेडकाने कोब्रा अर्धा गिळला होता आणि सापाचे डोके बाहेर चिकटले होते.

विशेष म्हणजे कोब्रा कसा तरी स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण बेडकाची पकड इतकी मजबूत होती की त्याला हलताही येत नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने केलाय त्याचा व्हिडीओसुद्दा वायरल होत आहे. आपल्या पायांनी बेडकाने सापाला आपल्याकडे ओढत खाऊन टाकले आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @creepydotorg नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “कधीच कुणाला हलक्यात घेऊ नका” तर आणखी एकानं, “म्हणून कुणालाच कमी समजू नका” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader