कोडफड ही अत्यंद गुणकारी आहे हे सर्वांनाच माहित आहे. ही अँटी बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड उपयूक्त ठरते. ही अँटी बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध आहे. पण त्याचा वापर तोंडाच्या स्वच्छता करण्यासाठी देखील होतो हे तुम्हाला माहित आहे का? किडलेल्या दातांपासून तोंडाच्या दुर्गंधीपर्यंत तोंडाच्या स्वच्छतेसंबधीत समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर ठरत आहे. चला जाणून घेऊ या….
तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी वापरा कोरफड
किडलेल्या दातांच्या समस्येसाठी वापरा कोरफड
किडलेल्या दातांच्या समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. हे गुणधर्म तोंडाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.
हिरड्यांना आलेली सूज
जर तुमच्या हिरड्या सुजल्या असतील तर तुम्ही कोरफडीच्या मदतीने ते कमी करू शकता. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे सूज कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही एलोवेरा जेलच्या मदतीने तुमच्या हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करू शकता किंवा कोमट पाण्यात मिसळून माऊथवॉश वापरू शकता.
हेही वाचा – व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असणे ही एक महामारी का होत चालली आहे? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या
रक्तस्त्राव रोखण्यासाठी फायदेशीर
कित्येकदा जखम झाल्यास आपल्या दाढेतून रक्तस्त्राव येऊ लागतो. त्यामुळे रक्त रोखण्यासाठी तुम्ही कोरफड वापरू शकता. रक्त येत असलेल्या ठिकाणी कोरफड लावल्यास तुम्हाला वेदनेपासूनही आराम मिळेल.
तोंडाचे बॅक्टेरिया नष्ट करते
तुमच्या तोंडात काही बॅक्टेरिया असतात जे हिरड्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यांचा नाश करण्यासाठी कोरफडही एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. यासाठी एलोवेरा जेलमध्ये थोडे मोहरीचे तेल मिसळून तोंडाच्या आतील भागात लावा. नंतर तोंड धुवा.
हेही वाचा – हिवाळ्यात मेथी पराठा आवडीने खाते अभिनेत्री क्रिती सॅनॉन; मेथी पराठा खाण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घ्या
दुर्गंधी काढून टाका
दिवसभर खाण्यापिण्याने तोंडाला दुर्गंधी येते. अनेकवेळा तोंड धुवूनही हा वास जात नाही. अशा परिस्थितीत कोरफडीचा गर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. दुर्गंधी दूर करण्यासाठी, ऍलोवेरा जेलमध्ये मोहरीचे तेल आणि चिमूटभर मीठ मिसळा आणि टूथपेस्टप्रमाणे दातांवर लावा.