स्वप्न पूर्ण होतात पण ते पूर्ण होण्यासाठी काही काळ लागतो असे म्हणतात. हे आपल्यापैकी कित्येक जणांनी ऐकलं असेल. पण काही लोकांच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडत आहे. भारतातील ८ सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह असेच काहीसे झालं आहे. हे इन्फ्लुएंस,सर्स इंस्टाग्राम अथवा युट्यूबर आपले रिल्स किंवा व्हिडिओ तयार करत होते आणि आज जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन भारताचे नाव मोठे करत आहे. या ८ इन्फ्ल्युअन्सर्सबाबत जाणून घेऊ या
मासूम मीनावाला
फॅशन ब्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मासूम मीनावाला हीने यंद्याच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती लावली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावताना अगदी एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. तिचा हा सुंदर गाऊन फाल्गुनी शेन पिकॉक यांनी डिझाइन केला होता. रफल्ड डेटिल गाऊन सोबत एक मोठा टेल लूक दिला होता.
दीपा खोसला
कपड्यांच्या ब्रँड मार्चेसामधून दीपा खोसला लाल रंगाच्या रफल्ड गाऊनमध्ये दिसली. ऑफ शॉल्डर गाऊनवर समोरच्या बाजूला एक सुंदर फुल जोडले होते. दीपा खोसलाने या सोबत डायमंडचे इअरिंग्ज आणि नेकलेस परिधान करुन आपला लूक पूर्ण केला होता.
कुशा कपिला
प्रसिद्ध कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हटके अंदाजात दिसली. तिने सोनेरीरंगाच्या डिझाईन असलेला ब्लॅक बॉडीकॉन शिमर गाऊन परिधान केला होता. यासोबत ती न्युड मेकअप आणि केसांचा अंबाडा केला होता ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत होती. हा ड्रेस अमित अग्रवालने डिझाइन केला आहे.
हेही वाचा – लखनऊ सुपर जायंट्स संघ ट्रोलिंगला वैतागला! ट्विटरवर अकाउंटसाठी घेतला ‘हा’ निर्णय
रुही दोसानी
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रुही दोसानीने देखील डिझायनर लेबल अमित अग्रवालचा एक आकर्षक काळा एम्बेलिश्ड पँट सूट परिधान केला होता. फुल स्लीव्ह पिन स्ट्रीप्ड ब्लेझरमध्ये फ्लॉरल एम्बेलिश्ड पॅटर्न आहे. यासोबत त्याने स्ट्रेट फिट ट्राउझर्स कॅरी केले होते.
निहारिका
निहारिका NM ने शंतनू निखिलने डिझाईन केलेला फ्रिल्स असलेला सुंदर लाल स्कर्ट परिधान केला होता. यासोबत ती लाल रंगाच्या स्ट्रॅपलेस टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने फक्त कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला.
हेही वाचा – कान्सच्या रेड कार्पेटवर मौनी रॉयचे पदार्पण; प्रिन्सेस लूकने चाहत्यांना लावलं वेडं!
डॉली सिंग
सोशल मीडियावर आपल्या कॉमेडीने सगळ्यांना प्रभावित करणारी डॉली सिंगनेही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती लावली. कान्सच्या रेड कार्पेटवर तिन अतिशय सुंदर ऑफ-व्हाइट ड्रेस परिधान केला होता. तिने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला धोती स्टाईल ड्रेस परिधान केला होता.
रणवीर अल्लाहबादिया
या सुंदरीशिवाय सोशल मीडिया स्टार रणवीर अल्लाहबादिया देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसला, त्याने राखाडी रंगाचा वेलवेट पँट सूट परिधान करते. थ्री पीस आऊटफिटसहीत त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्लॅक बो परिधान केला होता.
फरहाना मोदी
इस्टाग्राम इनफ्युएन्सर फरहाना मोदीने डिझाईनसर लेबल Nali ने डिझाईन केलेला बोल्ड आणि सुंदर गाऊन परिधान केला होता त्यासोबत एक शिअर ट्रेल देखील केला होता.
आपला लुक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ स्टेटमेंट इयररिंग्ज परिधान केल होते आणि केसांची स्टायलिश पोनी घातली होती.