Most trending memes of 2023 : काही दिवसांत २०२३ वर्ष संपणार आहे. अनेक चांगले वाईट अनुभव देणारे हे वर्ष होते. चंद्रावर पोहोचण्यापासून ते आर्थिक संकटापर्यंत आपला देश खंबीरपणे उभा राहिला आणि जगाला आपली ताकद दाखवून दिली. २०२३ मध्ये भारतात क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यात आला होता, तर जानेवारी २०२३ ते डिसेंबर या कालावधीत अनेक मोठे चित्रपटही प्रदर्शित झाले आणि बॉक्स ऑफिसवर त्यांनी धुमाकूळ घातला. अशातच आता गुगलने पुन्हा एकदा २०२३ चा सर्च रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले सेलिब्रिटी, अभिनेत्री, मीम्स, चित्रपट, खेळाडू इत्यादींचा समावेश आहे. यापैकी आज आपण २०२३ मध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या काही लोकप्रिय मीम्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
१. भूपेंद्र जोगी मीम (Bhupendra Jogi meme)
भूपेंद्र जोगी मीमने २०२३ मध्ये इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. एक मजेदार आणि संबंधित पात्र जे इंटरनेटवर व्हायरल झाले. हा मीम सर्वसामान्यांच्या रोजच्या संघर्षाचे प्रतीक बनले. या मीमने लोकांना खूप हसवलं.
२. मोये-मोये
‘मोये-मोये’ हे असे दोन शब्द होते, जे अचानक इंटरनेटवर लोकप्रिय झाले. प्रत्येक रील, लहान व्हिडीओ आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर याच्याशी संबंधित मीम्सने व्हायरल झाले. गुगलनुसार, ‘मोये मोये’ मीम इंटरनेटवरील दुसऱ्या नंबरचे सर्वात व्हायरल मीम ठरले.
३. जस्ट लुकिंग लाईक अ वॉव (Just looking like a wow)
सो ब्यूटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव; या मीमने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे मीम फॅशनचे दुसरे नाव बनले आहे. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणबीर सिंगनेही हे मीम पोस्ट केले आहे. हा ट्रेंड दिल्लीतील टिळक नगर येथील बुटिक स्टोअरच्या मालकाच्या व्हिडीओने सुरू झाला होता.
४. आयें (Aayein)
सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या बिहारमधील आदित्य कुमारला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आदित्यने त्याच्या आवडत्या विषयावर प्रश्न विचारल्यानंतर मजेशीर उत्तरे दिली होती. आदित्यची ही स्टाईल नेटकऱ्यांना खूप आवडली होती.
५. औकात देखा दी’ (Aukaat Dekha Di)
‘औकात देखा दी’ हे मीम सध्या इंटरनेटवर खूप लोकप्रिय होत आहे.
६. Only in Ohio
२०१६ मध्ये आलेल्या ‘Only in Ohio’ या विनोदातून निर्माण झालेल्या या मीमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
७. द बॉईज
‘द बॉईज मीम’च्या चाहत्यांनी रील तयार केल्या ज्यामध्ये मुलांशी संबंधित अनेक मजेदार गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
८. द एल्विश भाई (The Elvish Bhai)
एल्विश भाई मीमने तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी सीझन २ चे विजेते एल्विश यादववर बनवलेले हे मीम खूप मजेदार आहे. यामध्ये एल्विश भाई पेक्षा मोठं कोणीच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.