Princess From The Slum: स्वप्नांचे शहर म्हणून मुंबईला उगाच ओळखले जात नाही. या शहरात लोक आपली मोठमोठी स्वप्ने घेऊन येतात. त्यांची मेहनतच त्यांना यशाच्या दिशेने घेऊन जाते. असेच काहीसे १४ वर्षीच्या मलीशा खरवासोबत घडले आहे. धारवीच्या झोपडपट्टीमध्ये राहाणारी मलीशा आजच्या घडीला एखाद्या फिल्मस्टारपेक्षा कमी नाही. फॉरेस्ट एसेन्शियल या ब्युटी ब्रँड तिला ‘द युवती कलेक्शन’च्या जाहिरात मोहिमेचा एक भाग बनवणार आहे. झोपडपट्टीतून आलेली एक सामान्य मुलगी मलीशा जी आज इन्स्टा प्रिन्सेस आहे, तिची ही कहाणी फार रंजक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉलीवूड अभिनेत्याने दिली प्रेरणा

डान्स अॅकेडमी’, ‘कोट कार्टर’, ‘स्टेप अप द स्ट्रीट’, यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा रॉबर्ट हॉफमन हा हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. २०२० मध्ये रॉबर्टने मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका लहान मुलीचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला अन् ही मुलगी रातोरात प्रसिद्ध झाली. तेव्हापासून आजपर्यंत मलीशाचे इन्स्टाग्रामवर दोन लांखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

मलीशाने दिली मॉडेलिंगला आता नवी दिशा

मुंबईमधील धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या मलीशा खरवा हिने मॉडेलिंगच्या करिअरला आता नवी दिशा दिली आहे. मलीशा इन्स्टाग्रामवर मॉडेलिंग करत होती, आता ती फॉरेस्ट एसेन्शियल (Forest Essential) या आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडचा चेहरा झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मलीशाला लोकांकडून भरभरून प्रेम आणि आधार मिळाला आहे. मलीशा आपल्या शिक्षणासोबत मॉडेलिंग करू इच्छित आहे.

हेही वाचा – भन्नाट! दिल्ली ते मुंबई… या २० शहरांच्या मेट्रो प्रवासाची AI ने दाखवली झलक, कुठे दिसला वडापाव तर कुठे ढोकळा, पाहा फोटो!

Princess From The Slum: झोपडपट्टीची राजकुमारी

मलिशाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेहमी #princessfromtheslum म्हणजे ‘झोपडपट्टीची राजकुमारी’ असा हॅशटॅग वापरते. मलीशा कित्येक मॉडेलिंग असाइन्मेंट्समध्ये सहभागी झाली आहे, याशिवाय तिने एका शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे. मलीशाच्या शॉर्टफिल्मचे नाव Live Your Fairytale असे आहे.

फॉरेस्ट एसेंशियलने शेअर केला मलीशाचा व्हिडिओ

फॉरेस्ट एसेन्शियलने मलीशाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या डोळ्यांसमोर आपली स्वप्ने पूर्ण होताना पाहून तिचा चेहरा खुलतो. मलीशाची कहाणी पाहून, ‘स्वप्ने खरेच पूर्ण होऊ शकतात,’ यावर लोकांचा पुन्हा विश्वास बसतो. लोकांनी मलीशा एका ब्युटी ब्रँडचा चेहरा होणार आहे याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मलीशाला या ठिकाणी पोहोचलेले पाहून लोक अत्यंत खूश आहेत. एक फॅनने कमेंटमध्ये सांगितले की, “आपल्या देशात सावळ्या मुलींना कधीही ब्युटी ब्रँड्समध्ये घेतले जात नव्हते, पण आता काळ बदलला आहे.”

हेही वाचा – कॅडबरीच्या पॅकेजिंगचा रंग नेहमी जांभळाच का असतो? जाणून घ्या त्यामागचा रंजक इतिहास

मला मॉडेल व्हायचे आहे पण माझ्यासाठी अभ्यास

मलीशानेही तिचा आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, “फॉरेस्ट एसेन्शियलसोबत तिची ही मोहीम तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मलीशाचे स्वप्न मॉडेल होण्याचे आहे, पण तिला अभ्यासासोबतच काम करायचे आहे. “मला मॉडेल व्हायचे आहे, पण माझ्यासाठी अभ्यास नेहमीच पहिला असेल,” असे तिने सांगितले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From mumbais dharavi to the world of fashion this 14 year old girl maleesha kharwa becomes face of internantinal luxury beauty brand forest essential snk