Google trends: इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला कधीही कुठल्याही विषयासंबंधित माहिती सहज मिळते, ज्यात अगदी प्रवासापासून फॅशनपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. अनेक जण एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी जायच्या आधी त्या ठिकाणची माहिती मिळवतात. ही माहिती वेबसाइट्सच्या माध्यमातून मिळवली जाते. सध्या गूगल ट्रेंडवरील ट्रॅव्हल या कॅटेगरीमध्ये काय ट्रेंड सुरू आहे हे पाहूया…

ट्रॅव्हल कॅटेगरीमध्ये हे पाच कीवर्ड ट्रेंड

गूगल ट्रेंडवरील ट्रॅव्हल या कॅटेगरी ट्रेंडमध्ये असलेला पहिला कीवर्ड साऊथ अभिनेता कार्थी हा आहे, तर दुसरा कीवर्ड दार्जिलिंग हा आहे. तिसरा कीवर्ड पालघर असून चौथा कीवर्ड ‘वर्ल्ड ट्युरिझम डे’ हा कीवर्ड ट्रेंड होत आहे आणि पाचवा कीवर्ड ‘इजी माय ट्रिप’ हा ट्रेंड होत आहे.

हे पाच कीवर्ड सर्वाधिक ट्रेंड का होत आहेत?

भारतातील लोकप्रिय आणि सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिर सध्या खूप चर्चेत आहे. तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचे अंश आढळून आल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती लॅबच्या तपासणी रिपोर्टमधून समोर आली होती, तेव्हापासून देशभरात खळबळ उडाली आहे. या विषयावर अनेक दिग्गज आपले मत मांडत असताना, साऊथ अभिनेता कार्थी यानेदेखील आपले मत व्यक्त केले आहे; त्यामुळे साऊथ अभिनेता कार्थी हा कीवर्ड सध्या ट्रेंड होत आहे.

हेही वाचा: मॅगी स्मिथ, सुदेश लेहरी, रणवीर अलाहाबादिया गुगलवर सर्वाधित चर्चेत! मनोरंजन क्षेत्रातील आठवडाभर Google Trendsमध्ये असलेले टॉप ५ विषय

तसेच दुसऱ्या स्थानी चर्चेत असलेला दार्जिलिंग हा कीवर्ड मागील सात दिवसांपासून ६०० हून अधिक टक्के ट्रेंड होत आहे. हा कीवर्ड दार्जिलिंगच्या पर्यटन स्थळाबद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि तेथील पावसामुळे ट्रेंड होत आहे. तसेच तिसऱ्या स्थानी असलेला पालघर हा कीवर्ड ट्रेंड होण्यामागचे कारण पाहायला गेल्यास, हा कीवर्ड या परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि या ठिकाणी झालेल्या एका सामूहिक बलात्कार या विषयामुळे ट्रेंड झाला होता. मागील सात दिवसांत हा कीवर्ड ४०० हून अधिक टक्के ट्रेंड झाला आहे.

(फोटो सौजन्य: Google Trends)

चौथ्या स्थानी असलेला ‘वर्ल्ड ट्युरिझम डे’ हा कीवर्ड २७ सप्टेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड ट्युरिझम डे’मुळे ट्रेंड झाला होता. हा कीवर्ड ४०० हून अधिक टक्के ट्रेंड झाला आहे. तसेच पाचव्या क्रमांकावर असलेला ‘इजी माय ट्रिप’ हा कीवर्ड शेअर्स आणि डेबिट कार्ड संबंधित विषयांमुळे चर्चेत आहे. हा कीवर्ड ३०० हून अधिक टक्के ट्रेंड झाला आहे.