ख्रिसमस आता अगदी काही दिवसांवर आलेला आहे. या दिवशी अनेकांच्या घरामध्ये पाहुणे येत असतात, पार्टी ठेवलेली असते, एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. ऑफिसेसमध्येदेखील ख्रिसमससाठी ‘सीक्रेट सॅन्टा’ नावाचा खेळ खेळून मोठे हा सण साजरा करतात. त्यामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देणे अपेक्षित असते. खरे तर मोठ्यांना जितकी या दिवसाची आतुरता असते; त्याहून कितीतरी जास्त प्रतीक्षा घरातली चिल्लीपिल्ली करत असतात. कारण- त्यांना माहीत असते की, ख्रिसमसच्या दिवशी आपला लाडका सांताक्लॉज आपल्यासाठी, भेटवस्तू घेऊन येणार आहे. त्यासोबतच वर्षभर ज्या मुलांनी आपल्या आई-वडिलांचे ऐकलेले असते, ते सांताच्या गुणी मुलांच्या यादीत असतात आणि ज्यांनी खूप मस्ती केली आणि पालकांचे ऐकले नाही ते सांताच्या मस्तीखोर मुलांच्या यादीत असतात, असे पाश्चिमात्य संस्कृतीत सांगितले जात असते. मग त्यानुसार मुलांना सांता त्यांच्या आवडीची भेटवस्तू देणार की नाही हे ठरवले जाते, असेदेखील त्या लहानांना सांगतात.

परंतु, सांताला आपल्यासाठी कोणती भेट आणायची ते कसे समजणार? म्हणून लहान मुले त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टींची यादी करतात. त्या यादीमध्ये साधारतः खेळणी, कपडे, खाऊ, सायकल, उडणारे खेळण्यातले विमान किंवा गाडी यांसारख्या वस्तू लिहिलेल्या असतात. परंतु, सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हायरल पोस्टमध्ये एकाने जी यादी दिली आहे; त्यासाठी सांतालादेखील कर्ज काढावे लागेल, असे दिसते.

Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
fog shocking accident video
कडाक्याची थंडी, दाट धुकं अन् भयंकर अपघात! एकमेकांवर आदळल्या अनेक गाड्या; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हेही वाचा : Viral video : बसमधून प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाश्याची सोशल मीडियावर चर्चा; पाहा हा व्हायरल व्हिडीओ

एका रेड्डीट [Reddit] वापरकर्त्याने, ‘रेड्डीट’च्या माध्यमातून एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये लहान मुलाच्या अक्षरातील सांताला देण्यासाठी तयार केलेली एक यादी आपल्याला पाहायला मिळते. या यादीमध्ये अॅपलच्या उत्पादनांचा सर्वाधिक समावेश केला गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही यादीच इतकी खूप महाग वस्तूंनी इतकी भरली आहे की, नेटकरी चांगलेच अवाक झाले आहेत. ही यादी युनाइटेड स्टेट्स पोस्टल सेवेच्या [United States Postal Service] प्रोजेक्ट सॅन्टा [Project santa]साठी लिहिली असल्याचे समजते. या यादीमध्ये आयफोन १५, मॅकबुक, एअरपॉड्स, एअरपॉड्स प्रो, एअरपॉड्स मॅक्स, पोलोराइड कॅमेरा, ड्रॉइंग प्रोजेक्टर अशा प्रकारच्या वस्तूंची मागणी केली आहे.

“माझ्या प्रेयसीला एखाद्या गरजू लहान मुलाला मदत करायची होती. ज्या परिवारांना अशा गोष्टी विकत घेणं परवडत नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही; त्यांनादेखील सण साजरा करता यावा अशा मंडळींची यादी इथे पोस्ट केली जाते, असं वाटत होतं. त्यामधील ९० टक्के मुलं अशी आहेत की, ज्यांना ५०० डॉलर्सपेक्षा [साधारण साडेचाळीस हजार रुपये] अधिक किमतीच्या वस्तूंची अपॆक्षा आहे. आणि मला नाही वाटत की, कुणीही एवढ्या महागड्या वस्तू कुणाला विकत घेऊन देऊ शकतात. आता समजा, मी जर कुणाकडे काही भेटवस्तू मागत असेन, तर मी काही पीएस ५ [व्हिडीओ गेम] किंवा आयपॅड यांसारख्या अतिशय महागड्या अशा वस्तू अर्थातच मागणार नाही. जेव्हा लहान मुलं काही लिहीत असतात तेव्हा ती नीट विचार करून लिहीत आहेत ना याची काळजी पालक का घेत नाहीत? जेणेकरून त्यांनी मागितलेल्या महागड्या उपकरणांऐवजी त्यांना दुसरीही कोणती वस्तू मिळाली, तर मुलांचा हिरमोड होणार नाही.” अशी पोस्ट शेअर करताना लिहिले आहे.

हेही वाचा : Viral Video : बिस्किटाच्या पाकिटांपासून बनवली भन्नाट पर्स! कचऱ्यातून कला म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण पाहा

आता ही पोस्ट पाहताच अनेक नेटकऱ्यांनी भुवया उंचावल्या, तर त्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियादेखील आपल्याला पाहायला मिळतील.

यामध्ये काहींचे म्हणणे आहे की, आजकालची लहान मुलं कोणताही विचार करीत नाहीत आणि बिघडू लागली आहेत. तर “ही मुलं आहेत आणि त्यांना सांता खरेच आपल्यासाठी भेटवस्तू घेऊन येतो, असं वाटतं. त्यांना कुठे माहीत असतं की, भेट देणारे हे त्यांचे पालक असतात ते.” असेसुद्धा काहींचे मत आहे.

Letters it Santa USPS
byu/Phillyphan08 inmildlyinfuriating

एकाने, “ही पोस्ट पाहून मला थोडा राग आला. पण, नंतर मी लहान असताना मला हव्या असणाऱ्या सर्व खेळण्यांची मागणी मीसुद्धा केली असल्याचे मला आठवतं,” असे लिहिले आहे. “सांताकडे एखादी वस्तू मागताना भान ठेवून मागावं, असं मला माझ्या पालकांनी मला शिकवलं होतं,” असे दुसऱ्याने सांगितले. तिसऱ्याने, “अरे, ही एका लहान मुलानं त्याच्या मनानं सांतासाठी लिहिलेली ‘विशलिस्ट’ आहे. सध्या महागाई फारच वाढली आहे; मग आपण हे सगळं नको मागायला,’ असा विचार लहान मुलं कसा करतील?,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर शेवटी चौथ्याने, “मी लहान असताना माझा सांताक्लॉजवर विश्वास होता. तेव्हा मीसुद्धा एक घोडा, बार्बीच्या बाहुल्या, मॉलमध्ये पाहिलेली गाडी हे सगळं मागितलं होत. त्यापैकी सांता काहीतरी देईल. त्यामुळे लाजायचं कशाला?” अशी त्याच्या लहानपणाची आठवण सांगितली.

Story img Loader