तुम्ही कित्येकवेळा कॅब प्रवास केला असेल, जास्त भाडे सुध्दा भरले असेल. परंतु कॅबमधून फक्त इकडून तिकडे जाण्याची सुविधा असते. मात्र आता आम्ही तुम्हाला आम्ही एक अशी कॅब दाखवत आहे. त्यामधून तुम्ही कधी प्रवास केला नसेल. सोशल मीडियावर एका कॅब ड्रायव्हरची चर्चा आहे. होय, अब्दुल कादिर दिल्लीत कॅब चालवतो आणि त्याच्या कारमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. अगदी वायफायपासून बूट पॉलिशपर्यंत सर्व सुविधा या कॅबमध्ये दिल्या आहेत.

WiFi पासून बूट पॉलिश, सगळ्या सुविधा

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता, कॅबमध्ये मिनरल वॉटर आणि कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यांपासून ते आवश्यक औषधे, बिस्किटे, परफ्यूम, वर्तमानपत्रे, मास्क, शू पॉलिश, डस्टबिन आणि छत्री पर्यंत सर्व काही आहे. त्यांनी कॅबमध्ये एक नोटीसही लावली आहे, ज्यात लिहिले आहे, आम्ही प्रत्येक धर्माच्या लोकांचा आदर करतो. कपड्यांच्या आधारे आपण कोणताही धर्म ओळखू शकतो. विनम्र आवाहन, आपण एकमेकांशी नम्रपणे वागले पाहिजे आणि समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. विशेष म्हणजे या कॅबमधील सर्व सुविधा पूर्णपणे मोफत आहेत आणि यात वाय-फाय सुविधा देखील आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह

हेही वाचा – जंगलात विषारी सापाला पकडण्यासाठी गेले अन्…थरारक रेस्क्यूचा Video व्हायरल

गरीब मुलांसाठी दानपेटीही

हे कॅबचे फोटो श्याम लाल यादव यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते. त्यांनी आज मी ‘उबर’ वापरत आहे. मला एक अप्रतिम ड्रायव्हर भेटला. अब्दुल कादिर असे त्याचे नाव आहे. ते २६ वर्षांचे आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांनी एकही राइड रद्द केलेली नाही. त्याच्या गाडीत बरंच काही आहे. होय, प्रथमोपचार किटपासून प्रवाशांसाठी अनेक आवश्यक गोष्टी आहेत, ज्यासाठी अब्दुल कोणतेही अतिरिक्त शुल्क घेत नाही आणि हो, कॅबमध्ये गरीब मुलांसाठी दानपेटीही आहे. असे कॅप्शन श्याम यांनी लिहीले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: बापरे..! वाराणसीत बाळाला उकळत्या दुधाची अंघोळ; तडफडत होता चिमुकला, मात्र कुणालाच फुटला नाही पाझर

नेटकऱ्यांनी या कॅब ड्रायव्हरचं कौतुक केलं आहे, “सुदैवाने, मलाही दिल्लीत त्याच्या कॅबमध्ये बसण्याची संधी मिळाली होती”. हा एक अतिशय सुखद अनुभव होता, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर “तुम्ही तुमच्या व्यवसायावर प्रेम करता तेव्हा असे घडते” अशी प्रतिकिया दुसऱ्या युजरने दिली आहे.