Viral video: साऊथचा सुपरस्टार यशचा प्रसिद्ध चित्रपट ‘KGF’ मधला एक डायलॉग आहे, “माँ इस दुनिया में सबसे बड़ी योद्धा है!” खरं तर हा डायलॉग नाही तर जीवनातील सत्य आहे. आई आपल्या मुलांसाठी आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीशी लढायला तयार असते. ती मुलांसाठी जीवही देऊ शकते आणि गरज पडल्यास जीवही घेऊ शकते. दरम्या सोशल मीडियावर एका गरजू महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जी गरिबीत राहूनही आपल्या मुलांना शिक्षण देत आहे तर दुसरीकडे पोट भरण्यासाठी फळांचा स्टॉल लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

झारखंड प्रशासकीय सेवेचे पीसीएस अधिकारी ट्विटरवर खूप सक्रिय असतात. नुकताच त्यांनी ट्विटरवर एक फळ विक्रेत्या आईचा व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला आहे जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडिओमध्ये एक गरजू महिला दिसत आहे, जिने रस्त्याच्या कडेला फळांचा स्टॉल लावला आहे आणि शेजारीच ती आपल्या मुलांना शिकवताना दिसत आहे.

आईचा लेकरांसाठी संघर्ष

पण या व्हिडीओमधली हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे आईने स्वत:चे पोट भरण्यासाठी भीक मागण्याचा पर्याय निवडला नाही. उलट स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे ती हातगाडीवर फळे विकत आहे. फळे विकून तिला मोकळा वेळ मिळाला की ती परत जाते आणि मुलांना शिकवू लागते. या व्हिडीओमध्ये एक वाहन उभे आहे, ज्यावर इंग्रजीत KA लिहिले आहे… यावरून हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचा अंदाज लावता येतो, मात्र याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.

आईच्या संघर्षाचा VIDEO

हेही वाचा – Raksha Bandhan: ‘माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा’, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल

या व्हिडिओला ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक म्हणाला- ‘शब्द एकच आहे… आई!’ एकाने लिहिले- “आईपेक्षा मोठा योद्धा कोणी नाही. शंभर वडिलांपेक्षा एक आई श्रेष्ठ आहे!” एकजण म्हणाला- “माझ्या आई सारखा कोणी नाही.” एक म्हणाला- शिक्षित व्हा आणि सक्षम व्हा, शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे.