Viral Video: प्रत्येक व्यापाऱ्याला स्वतःच्या दुकानाची रक्षा करणे अगदीच कठीण बाब असते. त्यासाठी दुकानदार अनेकदा सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतात. पण, रस्त्यावरील अनेक विक्रेत्यांकडे अशी उपकरणे किंवा सुरक्षा रक्षक ठेवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या जवाबदारीने काही तरी युक्त्या वापरून यामधून उपाय काढावा लागतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; यामध्ये व्यापारी द्राक्ष फळाचे संरक्षण करताना तारेवरची कसरत करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्केटमध्ये एखादा पेरू, द्राक्ष विक्रेता दिसला की, आपल्यातील अनेक जण गाडीवरील एखादं द्राक्ष चोरण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. व्हायरल व्हिडीओत मधोमध रेल्वे रूळ आहे. रेल्वे रुळाच्या दोन्ही साईडला अनेक विक्रेत्यांची दुकाने आहेत. ट्रेन आणि दुकानांमध्ये इतकं कमी अंतर असते की, ट्रेनच्या दरवाजावर उभा असणारा सहज दुकानावर लटकवू ठेवलेला द्राक्षांचा घड सहज खेचू शकतो. द्राक्ष विकणाऱ्या विक्रेत्याने यासाठी कोणता उपाय शोधून काढला व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…३६० डिग्रीमध्ये फिरवला चहाचा कप अन्… ‘या’ चहा विक्रेत्याची सोशल मीडियावर चर्चा; पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओ बांगलादेशचा आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ एक फळांचा स्टॉल लावलेला दिसत आहे. हा स्टॉल इतका जवळ आहे की, रुळांजवळील फळांच्या दुकानात लटकलेल्या फळांपर्यंत कोणताही प्रवासी सहज पोहचू शकेल. त्यामुळे रेल्वे रुळावरून गाडी जाईपर्यंत हा प्रवासी द्राक्षांचा घड एका हाताने पकडतो तर दुसऱ्या हातात चक्क धारदार सुरु घेऊन उभा राहतो. म्हणजेच कोणी मुद्दामून द्राक्ष चोरी करू शकणार नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @reddit ॲपवरून शेअर करण्यात आल्या आहेत. फळांच्या स्टॉलजवळ उभं राहून दुकानदार लांब चाकू घेऊन पहारा देत आहे ; असे दिसते आहे. दुकानदाराने सीसीटीव्ही किंवा पहारेकरी न ठेवता धारदार सूरी घेऊन उभं राहून फळांचे संरक्षण करताना दिसला आहे ; जे अगदीच धोकादायक आहे. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून व्यापाऱ्याच्या या अनोख्या युक्ती पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.