पावसाळ्यात रस्त्यांवर जागोजागी खड्डे होतात. खड्ड्यांमध्ये पाणी साठते. काही रस्ते तर इतके खराब असतात की त्यांची अक्षरक्ष: चाळण होते. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. देशाच्या कानाकोपऱ्याच अशीच स्थिती पाहायला मिळते. दरम्यान वैतागलेल्या नागरिकांनी असे काही केले आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
तेलंगणातील कुथबुल्लापूर येथील बोवरमपेट येथील रहिवाशांनी रस्त्यांची खराब स्थिती आणि मोठ्या खड्ड्यांबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले. रहिवासी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांजवळ आले आणि त्यामध्ये रोपे लावू लागले. खड्यांमध्ये जा-ये करून वैतागलेल्या नागरिंकानी
रस्त्यावर रोप लावून नागरिकांनी प्रशासनाच्या बेजबाबदार कामाचे पितळ उघडे पडले आहे.
हेही वाचा – पावसाळ्यात धबधब्यावर जाण्याआधी हा Video पाहा! अचानक पाण्याचा जोर वाढला अन् अडकले ७० पर्यटक
जिस्ट न्यूजच्या वृत्तानुसार, एकप्रकारे आंदोलनात लोकांनी खड्ड्यांमध्ये भात पिकाची लागवड करून पालिका आयुक्त आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या निकृष्ट कामगिरीकडे लक्ष वेधले. खड्डेमय व पाणी तुंबलेल्या रस्त्यांमुळे दररोज ये-जा करणे कठीण झाले होते. तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे निदर्शने करण्यात आले. या आंदोलनाचा व्हिडिओही शुट करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लोक खड्ड्याजवळ उभे राहून भाताची रोपे लावताना दिसत आहेत. त्यांनी विरोध केला तेव्हा असंख्य लोक उभे राहून त्यांना आश्चर्याने पाहत होते. व्हिडिओ पोस्ट करत नागरिकांनी तातडीने रस्ता दुरस्त करण्याची कारवाई केली नाही.
हेही वाचा – ‘कॉलर पकडली, बुक्या मारल्या…पुणे पोलिसाची PMT बसचालकाला बेदम मारहाण, Video Viral
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नागरिकांच्या प्रयत्नांचे कौतूक केले. एकाने लिहिले की, “आंदोलन करण्याचा चांगला मार्ग आह” दुसरा म्हणाला, रस्त्यांची ही खेदजनक, वेदनादायक आणि लाजिरवाणी अवस्था आहे”