जुने वर्ष सरत आहे आणि या वर्षाला अवघे दहा दिवस बाकी असताना युट्युबवर तीन वर्ष जुना व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आला आहे. एका बंगल्यातून बाईकची चोरी करण्याचा चोर प्रयत्न करतो. यात तो काही अंशी यशस्वीही होतो. पण चोरी करताना सुरूवातीला केलेला आळसपणा त्याला इतका नडतो की अखेर बाईक तिथेचे टाकून त्याला पळ काढावी लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : नोटा भरण्यास उशीर झाला कारण…; योगेंद्र यादव यांचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल

युट्युबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आठवड्याभरापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक चोर बराच वेळ या घराच्या प्रवेशद्वारापाशी बसून आहे. योग्य वेळ मिळताच हा चोर प्रवेशद्वार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न करतो. पण या प्रवेशद्वाराला आतून टाळे असल्याने चोराला काही ते पूर्णपणे उघडता येत नाही. त्यामुळे कसाबसा जुगाड करत हा चोर आत शिरतो. आजूबाजूला कोणी पाहत नाही याची खात्री करुन घेत हेल्मेट घातलेला हा चोर बाईक घेऊन पळण्याच्या प्रयत्न करतो. बाईक ढकलत तो प्रवेशद्वारापाशी आणतो. पण आत प्रवेश करताना आपण प्रवेशद्वार अर्धवट उघडल्याचे त्याच्या लक्षात येते. तो त्यातूनही बाईक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरतात, कारण ती बाईक अडकून पडते.

VIDEO : छेडछाडीला विरोध करणा-या महिलेला भररस्त्यात मारहाण

दुसरीकडे घरमालकालाही बाईक चोरीची कल्पना येते. तेव्हा हातात फावडे घेऊन तो चोराला मारायला धावतो, अखेर मेहनतीवर पाणी सोडून हा चोर पसार होतो. २०१३ मधले हे सीसीटीव्ही फुटेज आहे. पण ‘व्हिडिओ मेकर’ या युट्युब पेजवर हे फुटेज गेल्या आठवड्यात टाकण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत साडेपाच लाखांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. युट्युबच्या ट्रेडिंग यादीतही या व्हिडिओ ट्रेंडिगमध्ये आहे.