Viral photo: आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. कोणताही व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो फक्त त्याची मार्केटींग करण्याचं स्किल तुमच्याकडे हवं. तुम्ही दुकानाच्या बाहेर वेगवेगळे पोस्टर, पाट्या पाहिल्या असतील. अनेकदा बंद दुकानाबाहेरही जाहिरातीच्या पाट्या, पोस्टर लावलेले असतात. यामध्ये दुकान भाड्याने देणे आहे, गाळा भाड्याने देणे आहे. तसेच कामासाठी मुली पाहिजेत असे पोस्टर असतात. असेच एका झोरॉक्स दुकानाबाहेरची पाटी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून झोरॉक्स दुकानाबाहेरची पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमीच चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. दरम्यान ही पुणेरी स्टाईल पाणी नेमकी कुठली आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र पाटी लिहणारा नक्कीच पुणेकर असणार असं नेटकरी म्हणत आहेत. ग्राहक आपल्याच दुकानात झेरॉक्स काढायला यावेत यासाठी या दुकान मालकानं असं डोकं लावलंय की तुम्ही विचारही करु शकत नाही. दुकानाबाहेरच्या याच पाटीमुळे लोक या दुकानात गर्दी करत आहेत.

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पाटीवर? तर या झेरॉक्सच्या दुकानाबाहेरील पाटीवर “कॅनन झेरॉक्स डोळ्याची पापणी उघडण्याच्या आत काढून मिळेल. ” असा आशय मिळाला आहे. आपल्याला माहिती आहे, झेरॉक्सच्या दुकानाबाहेर किती गर्दी असते. एखाद घाईचं काम असलं की झेरॉक्सच्या दुकानात बराच वेळ जातो. मात्र जिथे पटकन काम होतं तिथे आपण प्राधान्य देतो. अशाच एका दुकानाच्या बाहेर ही पाटी लावल्याने लोक तिथेच जात आहेत. तसेच दुकानादाराच्या मार्केटींग आयडीयाचंही सर्वत्र कौतुक होतंय.

पाहा पाटी (लिंकवर क्लिक करा)

https://www.instagram.com/reel/DAciB89yPv8/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा >> तुम्हीही मुलांना बिस्किट देता का? ब्रिटानियाच्या ‘या’ बिस्किटमध्ये काय सापडंल पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

सोशल मीडियावर हा फोटो editor_sonu_xx नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “पुणेकर काय करतील आणि कुठे आपली क्रिएटिव्हिटी दाखवतील याचा नेम नाही.” तर आणखी एकानं “पुणेकरांचा नाद नाय!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.