‘मिलेनियल’ जनरेशन धमाल आहे. साधारणपणे १९८५ नंतर जन्माला आलेल्या ‘बाळांचा’ या पिढीमध्ये समावेश केला जातो. ही सगळी पिढी १९९०च्या दशकात वाढली. या पिढीतले भारतात वाढलेले शिलेदार जवळजवळ संपूर्णपणे ग्लोबलायझेशनच्या जमान्यात वाढले. लहानपणी जास्त टीव्ही पाहतो, जास्त कॅडबरी खातो मग दात किडतात वगैरे कारणांनी आईबाबांचे फटके खाल्लेल्या या पिढीने शाळा सोडत काॅलेजमध्ये गेल्यावरही आणखी त्रास देत आईबाबांना हात टेकायला लावले.
आता ही सगळी बाळं प्रोफेशनल आयुष्यात सेटल झालीयेत किंवा ‘आतल्या मनाची साद’ एेकण्याचा प्रयत्न वगैरे करत नवीन गोष्टी ट्राय करत आहेत. नवे प्रयोग करून पाहण्याच्या बाबतीत किंवा मनात आली ती गोष्ट धडाडीने प्रत्त्यक्षात उतरवण्याच्या बाबतीत मिलेनियल जनरेशनचा हात कोणीच धरू शकत नाही. पण जगभर सगळ्याच क्षेत्रात जबरदस्त स्थित्यंतरं घडत असलेल्या काळात मोठ्या झालेल्या या ‘कोवळ्या मनांचा’ समाजात वावरण्याचाही एक विशिष्ट आणि मजेदार पॅटर्न तयार झालाय.
लेखक मायकल वूल्फ आणि चित्रकार अँडर्स माॅर्गेंथालर या जोडीने याच विषयांवर कार्टून्स तयार केली आहेत. मिलेनियल पिढीच्या पाईकांचा रोजच्या जीवनामधला आचरटपणा त्यांनी कार्टून्समधून मस्त दाखवलाय
नेटसीरिजच्या जमान्यात हा प्रश्न वैवाहिक, सामाजिक संबंधात मोठा तणाव निर्माण करतोय.
थर्टीफर्स्ट पार्टीसाठी कोणीच बोलावलेलं नाहीये. पण प्लॅन बनवतोय हे आजूबाजूच्यांना दाखवायला तरी हवं ना !
बाजूला बसलेल्या ओळखीच्या माणसांशी बोलायचं नसेल तर हा उपाय वापरा. लॅपटाॅपच्या जागी स्मार्टफोन, टॅबलेट, आॅफिस फाईल किंवा गेलाबाजार पीएसपी किंवा पुस्तकही चालेल
कोलंबसने अमेरिका शोधली आम्ही खाबूगिरीचे नवे अड्डे शोधतो. पण तोरा तोच!
नवीन हेअरकट केल्यावर…
हाराकिरीची नवीन पध्दत. इन्स्टाग्रॅमवर फिल्टरशिवाय फोटो टाकणं
कुठेही जा, अक्कल झाडा सौजन्य : wumo.com
त्यांची अशी अनेक कार्टून्स त्यांनी त्यांच्या साईटवर टाकली आहेत. आपल्या समाजमनाचा आरसा वगैरे म्हणून बिलकूल नाही, पण दिवसभर पकल्यानंतर टाईमपास करत हसायला छान आॅप्शन आहे हा!